तडाखेबंद फलंदाजीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात धूमशान घालणाऱ्या युवा जेक फ्रेझर-मॅकगर्कला ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी२० वर्ल्डकप संघात स्थान मिळालेलं नाही. जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली. दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून माघार घेऊन मायदेशी परतलेला मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. सार्वकालीन महान फलंदाजांमध्ये गणना होणाऱ्या स्टीव्हन स्मिथला मात्र या संघातून डच्चू देण्यात आला आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघासाठी जेकने धावांची टांकसाळ उघडली आहे. दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांच्या सूचनेनंतरच जेकला दिल्ली संघात समाविष्ट करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने जेकच्या गुणवत्तेविषयी काही महिन्यांपूर्वी भाष्य केलं होतं. आयपीएलमधली त्याची कामगिरी पाहता वर्ल्डकप संघात त्याची निवड अपेक्षित होती मात्र निवडसमितीने संघाचं ठरलेला ढाचा बदललेला नाही.
१२ एप्रिल रोजी जेकने लखनऊविरुद्ध आयपीएल पदार्पण केलं. या सामन्यात त्याने ५५ धावांची वेगवान खेळी केली. पदलालित्यापेक्षा हँडआय कोऑर्डिनेशनवर भर देत जेक खेळतो. हैदराबादविरुद्ध त्याने ६४ धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्सविरुद्ध तो आयपीएल स्पर्धेतला कमीत कमी चेंडूत शतकाचा विक्रम मोडणार अशी चिन्हं होती. पण तो बाद झाल्याने हा विक्रम अबाधित राहिला. त्याने २७ चेंडूत ८४ धावांची खेळी साकारली.
फॅब फोरमध्ये गणना होणाऱ्या स्टीव्हन स्मिथची ट्वेन्टी२० कारकीर्द संपुष्टात आल्याचं स्पष्ट झालं आहे. टेस्ट आणि वनडेत गेलं दीड शतक खोऱ्याने धावा करणारा स्मिथ ट्वेन्टी२० प्रकारात मात्र लौकिकाला साजेसा खेळू करू शकलेला नाही. आयपीएल स्पर्धेतही त्याला संघात समाविष्ट करण्यात कोणीही स्वारस्य दाखवलं नाही. काही दिवसांपूर्वी आयपीएल समालोचनाच्या निमित्ताने तो मुंबईत होता. ऑस्ट्रेलियाच्या निवडसमितीने स्मिथसारख्या अनुभवी फलंदाजाला वगळत युवा खेळाडूंना प्राधान्य देणार असल्याचं सिद्ध केलं. स्मिथने ६७ सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करताना १०९४ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाने २०२१ मध्ये ट्वेन्टी२० जेतेपदावर कब्जा केला होता. त्याची पुनरावृत्ती करण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलियाने अष्टपैलू बहुल संघ निवडला आहे. डेव्हिड वॉर्नरसाठी हा शेवटचा ट्वेन्टी२० वर्ल्डकप असणार आहे. अन्य प्रकारातून त्याने आधीच निवृत्ती घेतली आहे. वॉर्नरच्या बरोबरीने ट्रॅव्हिस हेड सलामीला येईल. मिचेल मार्श तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. मार्कस स्टॉइनस, कॅमेरुन ग्रीन, टीम डेव्हिड आणि ग्लेन मॅक्सवेल हे तिघे मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. जोश इंगलिस आणि मॅथ्यू वेड यष्टीरक्षण आणि फलंदाजी अशी दुहेरी जबाबदारी हाताळतील. अॅडम झंपा आणि अॅश्टन अगर यांच्याकडे फिरकीची धुरा आहे. टेस्ट, वनडे प्रकारात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व पॅट कमिन्स करतो. ट्वेन्टी२० वर्ल्डकपमध्ये मात्र कमिन्स विशेषज्ञ गोलंदाज म्हणून खेळणार आहे. कमिन्स- मिचेल स्टार्क-जोश हेझलवूड या त्रिकुटाच्या बरोबरीने नॅथन एलिसला संधी देण्यात आली आहे.

मॅथ्यू शॉर्ट, जेसन बेहनड्रॉफ, आरोन हार्डी, स्पेन्सर जॉन्सन, झेव्हियर बार्टलेट यांच्यासह जेक फ्रेझर-मॅकगर्क यांचा संघनिवडीसाठी विचार झाला. हे सगळेजण चांगली कामगिरी करत आहेत. पण वर्ल्डकपसाठी १५ सदस्यीय संघच निवडता येतो. त्यामुळे मर्यादा असतात असं ऑस्ट्रेलियाच्या निवडसमितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी सांगितलं.