James Anderson Announced Retirement: कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या जेम्स अँडरसनने निवृत्ती जाहीर केली आहे. वेस्ट इंडिजविरूद्धचा कसोटी सामना खेळल्यानंतर अँडरसन निवृत्त होणार अशी माहिती त्याने स्वत: दिली आहे. इंग्लंडला येत्या काळात ६ कसोटी खेळायच्या आहेत. पण अँडरसन वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर निवृत्त होईल. हा सामना १० जुलैपासून सुरू होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


जेम्स अँडरसनने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. त्यात त्याने लिहिले की, ‘लॉर्ड्सवरील उन्हाळ्यातील पहिली कसोटी ही माझी शेवटची कसोटी असेल, हे सांगण्यासाठी मी ही पोस्ट लिहित आहे. माझ्या आवडीचा खेळ खेळत देशाचे प्रतिनिधित्व करतानाची ही २० वर्षे अविश्वसनीय होती. इंग्लंडकडून मैदानावर खेळण्यासाठीचा उतरतानाचे त्या क्षणांची कायम आठवण येत राहिल. पण मला माहित आहे की थांबण्याची आणि इतरांना त्यांची स्वप्ने साकार करू देण्याची हीच योग्य वेळ आहे.

हेही वाचा- ‘काय हिरो, गार्डनमध्ये आला आहे का?’ तिलक वर्माचं उत्तर ऐकून रोहित शर्माच झाला चकित, VIDEO व्हायरल


७०० कसोटी विकेट घेणाऱ्या अँडरसनने पुढे लिहिले – डॅनिएला, लोला, रुबी आणि माझ्या पालकांच्या प्रेम आणि पाठिंब्याशिवाय मी हे करू शकलो नसतो. त्यांचे खूप खूप आभार. तसेच सर्व खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचेही आभार. मी पुढील नवीन आव्हानांसाठी उत्सुक आहे, तसेच जास्तीत जास्त वेळ गोल्फ खेळण्यासाठी मिळणार आहे.


मे २००३ मध्ये अँडरसनने आपली क्रिकेट कारकिर्द सुरू करत घवघवीत यश मिळवलेच पण अनेक अद्वितीय अशा विक्रमांना गवसणीही घातली.अँडरसनने इंग्लंडसाठी १८७ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात १९४ एकदिवसीय आणि १९ टी-२० सामने आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ७०० विकेट्ससह, तो शेन वॉर्न (७०८) आणि श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (८००) नंतर सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या शेवटच्या कसोटीत त्याने ९ विकेट घेतल्यास तो शेन वॉर्नला मागे टाकून दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज बनेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: James anderson announces retirement from international cricket with instagram post will play last test at lords eng vs wi bdg