वृत्तसंस्था, मुंबई
इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन पुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिसू शकेल. सौदी अरेबियातील जेद्दा येथे २४ आणि २५ नोव्हेंबरला होणाऱ्या ‘आयपीएल’ लिलावासाठी १५७४ खेळाडूंनी नोंदणी केली असून यात अँडरसनचा समावेश आहे. इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने मात्र लिलावासाठी नाव नोंदवलेले नाही. त्यामुळे तो आगामी हंगामाला मुकणार आहे. तसेच अपेक्षेप्रमाणे भारताच्या सर्वच आघाडीच्या खेळाडूंचा लिलाव यादीत समावेश आहे.
लिलावासाठी १५७४ खेळाडूंनी आपली नावे नोंदवलेली असली, तरी सर्व फ्रँचायझींशी चर्चा केल्यानंतर यातील बरीचशी नावे वगळण्यात येतील. ‘आयपीएल’मधील सर्व १० फ्रँचायझींनी काही दिवसांपूर्वीच काही खेळाडूंना संघात कायम ठेवले होते, तर अन्य खेळाडूंना संघमुक्त केले होते. संघमुक्त करण्यात आलेले ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल यांसारखे आघाडीचे भारतीय खेळाडू लिलावादरम्यान उपलब्ध असतील.
मुंबईकर फलंदाज सर्फराज खानला गेल्या हंगामात कोणत्याही संघाने संधी दिली नव्हती. मात्र, कसोटी पदार्पण केल्यापासून त्याने काही चांगल्या खेळी केल्या आहे. त्यामुळे ‘आयपीएल’च्या आगामी हंगामात त्याचे पुनरागमन होऊ शकेल. सर्फराज, तसेच दिल्ली कॅपिटल्सने संघमुक्त केलेल्या पृथ्वी शॉ याने आपली मूळ किंमत ७५ लाख रुपये ठेवली आहे.
तसेच मूळचा भारतीय, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेकडून चमकदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरही प्रथमच ‘आयपीएल’मध्ये खेळताना दिसू शकेल. काही महिन्यांपूर्वी झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत नेत्रावळकरने विराट कोहली, रोहित शर्मा आणि मोहम्मद रिझवान यांसारख्या नामांकित फलंदाजांना बाद केले होते. त्याने ३० लाख रुपये अशी मूळ किंमत निश्चित केली आहे.
भारतीयांची २ कोटीला पसंती
● सध्या भारतीय संघाचा भाग असलेल्या किंवा यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या बहुतेक भारतीय खेळाडूंनी आपली मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवणे पसंत केले आहे.
● यात ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंवर मोठी बोली लागणे अपेक्षित आहे.
● मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, खलील अहमद, मुकेश कुमार, आवेश खान, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, प्रसिध कृष्णा, टी. नटराजन आणि उमेश यादव या वेगवान गोलंदाजांवरील बोलीलाही २ कोटी रुपयांपासून सुरुवात होईल.
● अन्य भारतीयांमध्ये वॉशिंग्टन सुंदर, वेंकटेश अय्यर, इशान किशन, कृणाल पंड्या आणि देवदत्त पडिक्कल या खेळाडूंनीही सर्वाधिक मूळ किंमत राखणेच पसंत केले आहे.
१.२५ कोटी मूळ किंमत
आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्त झालेल्या जेम्स अँडरसनची क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. त्याने १८८ सामन्यांत ७०४ बळी मिळवले. मात्र, तो बऱ्याच काळापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून दूर आहे. अँडरसनने अखेरचा ट्वेन्टी-२० सामना १० वर्षांपूर्वी खेळला होता. आता त्याने ‘आयपीएल’ लिलावासाठी प्रथमच आपले नाव नोंदवले आहे. त्याची मूळ किंमत १.२५ कोटी रुपये असणार आहे. ४२ वर्षीय अँडरसनला ‘आयपीएल’ पदार्पणाची संधी मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
इटलीचा गोलंदाज यादीत
वेगवान गोलंदाज थॉमस ड्रागा हा ‘आयपीएल’ लिलावासाठी नाव नोंदवणारा इटलीचा पहिला खेळाडू ठरला आहे. याच वर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या ड्रागाने चार सामन्यांत आठ बळी मिळवले आहेत. त्याने ऑगस्टमध्ये झालेल्या ग्लोबल ट्वेन्टी-२० कॅनडा लीगमध्ये चांगली कामगिरी केली होती. सहा डावांत त्याने ११ बळी मिळवतानाच षटकामागे केवळ ६.८८ धावा दिल्या. संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ‘आयएलटी२०’ स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या एमआय अमिराती संघाने ड्राकाला करारबद्ध केले आहे. ‘आयपीएल’ लिलावासाठी ड्राकाचा अष्टपैलू खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला असून ३० लाख रुपये अशी त्याची मूळ किंमत असेल.