रवींद्र जडेजाला उद्देशून आक्षेपार्ह भाषा आणि वर्तन केल्याप्रकरणी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन वादाच्या भोवऱयात सापडला आहे.
रवींद्र जडेजाला उद्देशून अवमानकारक भाषा आणि ढकलल्याचा आरोप अँडरसनवर आहे. या आरोपानुसार दोषी आढळल्यास अँडरसनवर दोन ते चार कसोटी सामन्यांची बंदी येऊ शकते.
टेंटब्रिज कसोटीच्या दुसऱया दिवशी उपाहारकरता दोन्ही संघ ड्रेसिंगरुममध्ये परतत असताना हा प्रकार घडला. दरम्यान, झालेल्या प्रकाराबद्दल भारतीय संघाचे व्यवस्थापक सुनील देव यांनी तक्रार दाखल केली. आयसीसीने भारतीय संघाच्या तक्रारीवरून या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयुक्ताची नेमणूक केली आहे.  आयसीसीच्या आचारसंहितेच्या नियमांनुसार अँडरसनवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. अँडरसनने या आरोपांचा इन्कार केला असून इंग्लंडचे क्रिकेट मंडळही त्याच्या पाठिशी आहे. ही एक किरकोळ घटना असून या प्रकारास जास्त महत्व देऊन नये अशी भूमिका इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने ठेवली असून उलट, जडेजाविरुद्धच आरोप केले आहेत.

Story img Loader