Ishant Sharma on Zaheer Khan: भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान आणि इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यातील तुलनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. इशांतने झहीर खानचे कौतुक करत तो इंग्लंडच्या जेम्स अँडरसनपेक्षा सरस असल्याचे सांगितले. अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. मात्र, “जर तो आशियायी असता तर एवढा मोठा विक्रम करू शकला नसता”, असे म्हणत त्याने नवीन वादाला तोंड फोडले आहे.

‘बीयरबाइसेप्स’ युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत इशांत शर्मा म्हणाला, “जेम्स अँडरसनची गोलंदाजीची शैली आणि पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. तो इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीत खेळतो. जर तो भारतात खेळला तर झहीर खान त्याच्यापेक्षा (जेम्स अँडरसन) सरस गोलंदाज असेल. कारण, भारतातील खेळपट्ट्यांवर तो एवढ्या विकेट्स घेऊ शकला नसता. आशियातील बहुतेक खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजांना साथ देणाऱ्या आहेत.”

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?
Mohammed Siraj Statement on Travis Head Sendoff Incident Said Its a lie that he said well bowled to me
Siraj on Travis Head Fight: “हेडने सांगितलं ते खोटं आहे…”, मोहम्मद सिराजचं ट्रॅव्हिस हेडच्या वादावर मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

इशांतने २०१४च्या वेलिंग्टन कसोटीबद्दलही सांगितले

या मुलाखतीत इशांत शर्माने २०१४च्या वेलिंग्टन कसोटीत घडलेल्या किस्सा याबद्दल सांगितले. या कसोटीत झहीर खानने इशांतच्या गोलंदाजीवर झेल सोडल्यानंतर तो झहीरवर भडकला होता. त्याला गैरवर्तन केल्याचा आरोपावरून दंड देखील ठोठावण्यात आला होता. याबाबत इशांत शर्माने सांगितले की, “झहीर खान त्याचा गुरू आहे आणि त्याने कधीही झेल सोडल्याबद्दल कोणाला शिवीगाळ केली नाही. फक्त तो त्याच्यावर भडकलो होता कारण, सामना निर्णायक वळणावर होता.”

हेही वाचा: Chris Gayle: ‘युनिव्हर्स बॉस’ला पडली रोनाल्डोच्या सेलिब्रेशनची भुरळ, गेलच्या पोस्टवर युवराज सिंगची खास प्रतिक्रिया, Video व्हायरल

इशांत शर्मा पुढे म्हणाला, “मी ते स्वत:शीच बोललो पण त्याच्यावर फक्त संतापलो होतो. आजही लोकांना कळत नाही की मी हे कोणाला म्हटलंय. मी कधीही कोणत्याही खेळाडूला झेल सोडल्याबद्दल शिवीगाळ केली नाही. जॅकला (झहीर खान) कसं सांगू, तो माझा गुरु आहे नी गुरूला शिव्या कोणी देईल का?”

जेम्स अँडरसन आणि झहीर खान यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

विशेष म्हणजे जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने १८० कसोटी, १९४ एकदिवसीय आणि १९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याच्या नावावर कसोटीत ६८६, एकदिवसीय सामन्यात २६९ आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १८ विकेट्स आहेत.

हेही वाचा: Sunil Gavaskar: एम.एस. धोनी नाही तर ‘हा’ दिग्गज खेळाडू आहे सुनील गावसकरांच्या मते ओरिजिनल ‘कॅप्टन कूल’

जेम्स अँडरसनची भारतातील कामगिरी

इंग्लिश वेगवान गोलंदाजाने भारतात १३ कसोटी सामने खेळले असून २९.३२च्या सरासरीने ३४ विकेट्स घेतले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, ४० वर्षीय खेळाडूने अद्याप भारतात पाच बळी घेण्याची नोंद केलेली नाही. दरम्यान, झहीरने इंग्लंडमध्ये आठ सामन्यांत २७.९६च्या सरासरीने ३१ विकेट्स घेतले आणि एकदाच पाच विकेट्स घेतले. झहीर खानच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, जॅकने ९२ कसोटी, २०० वन डे आणि १७ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याच्या नावावर कसोटीत ३११, एकदिवसीय सामन्यात २८२ आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १७ विकेट्स आहेत.

Story img Loader