इंग्लंडच्या जेम्स अँडरसनचा भारतीय कर्णधारावर आरोप
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लंडन : भारतीय कर्णधार विराट कोहलीने जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक मैदानावर खोऱ्याने धावा बनवल्या आहेत. मात्र, इंग्लंडमधील खेळपट्टय़ांवर विशेषत: लाल चेंडूसमोर कोहली नेहमीच अपयशी ठरतो, असेच चित्र आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे, संघ जिंकत असल्यास स्वत:च्या धावा होणे किंवा न होण्याने काहीही फरक पडत नाही असे म्हणणे म्हणजे एकप्रकारे सत्य नाकारणे आहे, असा आरोप इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने सोमवारी दिली.
भारत व इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला १ ऑगस्टपासून सुरुवात होत असून या पाच सामन्यांच्या मालिकेत साहजिकच कोहली आणि अँडरसन यांच्यातील झुंजीकडे संपूर्ण विश्वाचे लक्ष लागले आहे. ‘‘जोपर्यंत भारतीय संघ विजयी कामगिरी करतो आहे, तोपर्यंत मला माझ्या किती धावा होत आहेत, त्याने काहीही फरक पडत नाही,’’ अशी प्रतिक्रिया कोहलीने रविवारी दिली होती. यावर अँडरसने कोहलीला खोटे पाडून त्याला सद्यपरिस्थितीची जाणीव करून दिली.
‘‘c त्यामुळेच बॅटमधून धावा निघणे कठीण जात असूनही आपल्याला काहीच फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया कोहलीन देणे म्हणजेच तो खोटे बोलतो आहे, हे सिद्ध होते,’’ असे अँडरसन म्हणाला.
२०१४च्या कसोटी मालिकेत कोहलीने पाच सामन्यांत मिळून अवघ्या १३४ धावा बनवल्या होत्या. त्याशिवाय ३५ वर्षीय अँडरसनने त्या दौऱ्यात कोहलीला अनेकदा आपल्या तालावर नाचवून सहा डावांपैकी चार वेळा त्याला बाद केले होते.
‘‘कोहलीचे फॉर्मात असणे हे भारतासाठी किती महत्त्वाचे आहे, हे मी वेगळे सांगायला नको. २०१६च्या कसोटी मालिकेत त्याने आमच्याविरुद्ध मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. मात्र, ती मालिका भारत आपल्या देशातील खेळपट्टयांवर खेळत होता, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. कोहली हा एक चाणाक्ष व अव्वल दर्जाचा फलंदाज असून आपल्या चुकांमधून तो नेहमीच शिकत असतो. त्यामुळे यंदादेखील आम्ही त्याच्या फलंदाजीवर विशेष लक्ष पुरवणार आहोत,’’ असे अॅँडरसन म्हणाला.
अँडरसन स्वत: विदेशात अपयशी
गेल्या काही मालिकांपासून अँडरसनचा गोलंदाजीतील सूरही हरवलेला आहे. २०१६च्या कसोटी मालिकेत त्याने चार कसोटींतून फक्त तीन बळी मिळवले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेस मालिकेतही त्याने पाच सामन्यांत मिळून १० बळी मिळवले होते. त्यामुळे घरच्या मैदानावर सिंहासारखी कामगिरी करणारा अँडरसन विदेशांत स्वत: मात्र अपयशी ठरत आहे.