James Anderson Retirement: इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ खूप पुढे आहे. विक्रमी १८८ कसोटी सामने खेळणारा जेम्स अँडरसनने २००३ मध्ये पदार्पण केले होते. अँडरसनला विचारण्यात आले की, त्याने ज्या फलंदाजांना गोलंदाजी दिली त्यापैकी सर्वोत्तम फलंदाज कोण आहे. यावर त्याने भारताच्या दिग्गज फलंदाजाचे नाव घेतले.

स्काय स्पोर्ट्सशी बोलताना एका प्रश्नाचे उत्तर देताना अँडरसन म्हणाला: “मी गोलंदाजी केलेला सर्वोत्तम फलंदाज म्हणजे सचिन तेंडुलकर मी म्हणेन.” अँडरसनने भारतीय संघाविरुद्ध कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेतले आहेत. अँडरसनने भारताविरुद्ध १४९ विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये अँडरसनने सचिन तेंडुलकरला कसोटीत एकूण ९ वेळा बाद केले आहे. सचिनविषयी बोलताना अँडरसन काय म्हणाला पाहूया.

Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका
India wicketkeeper batsman Sanju Samson expressed his feelings about the comeback sport news
अपयशानंतर स्वत:च्याच क्षमतेवर प्रश्न! कर्णधार, प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे बळ; विक्रमवीर सॅमसनची भावना

हेही वाचा – Ben Stokesने कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास, इंग्लंडसाठी ही कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

अँडरसनने सचिनला नऊ वेळा बाद केले असेल पण तो भारतीय मास्टर ब्लास्टरविरुद्ध कोणतीही निश्चित योजना करू शकला नाही. जेव्हा अँडरसनला विचारले गेले की त्याने गोलंदाजी केलेला सर्वाेत्कृष्ट फलंदाज कोण होता, तेव्हा तो म्हणाला, “मला म्हणायचे आहे की सचिन तेंडुलकर सर्वोत्तम फलंदाज आहे. मला आठवतं नाही की सचिन तेंडुलकरविरूद्ध कधी खास रणनिती आखली होती.”

अँडरसन पुढे म्हणाला, “तो एकदा मैदानात फलंदाजीला आला की मी फक्त इतकाच विचार करायचो मी त्याला एकही खराब चेंडू टाकू शकत नाही. तो खेळाडूही तसाच होता. तो भारतासाठी इतका महत्त्वाचा खेळाडू होता की त्याला बाद केल्यानंतर भारतातील मैदानावरील चित्र बदलून जायचं. सचिनची विकेट खूप मोठी असायची.”

हेही वाचा – BCCIचा गौतम गंभीरला धक्का, प्रशिक्षक म्हणून निवडलेल्या कोचिंग स्टाफला बोर्डाने दिला नकार

अँडरसनने मात्र सांगितले की, “मी आणि तेंडुलकरने एकमेकांविरुद्ध यश मिळवले आहे. तो म्हणाला, ‘तुम्ही नेहमीच सर्वोत्तम चेंडू टाकण्याचा प्रयत्न करता आणि आशा करता की तो सरळ चेंडूवर चूक करेल. इंग्लंडमध्ये तो एक-दोनदा खेळायचा पण साधारणपणे मी त्याला लवकर एलबीडब्ल्यू आऊट करण्याचा प्रयत्न करायचो.”

हेही वाचा – Champions Trophy: भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही, BCCI ने ICC समोर मांडला नवा प्रस्ताव

अँडरसनने २१ वर्षे कसोटी क्रिकेट खेळून वेगवान गोलंदाजांसाठी एक आदर्श ठेवला आहे. १८८ कसोटी सामने खेळणारा एखादा गोलंदाज पुन्हा क्वचितच घडेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ७०० विकेट घेणारा तो पहिला वेगवान गोलंदाज आहे आणि त्याने भारत दौऱ्यात आपल्या ७०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या.