James Anderson World Record in Test Cricket: इंग्लंड क्रिकेट संघाचा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आपल्या ऐतिहासिक क्रिकेट कारकिर्दीतील अखेरचा कसोटा सामना खेळत आहे. वेस्ट इंडिजविरूद्धची ही कसोटी मालिका सध्या इंग्लंडमध्ये खेळवली जात आहे. या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या डावात अँडरसनने १० षटकांत ११ धावा देऊन २ विकेट घेतले आणि ५ मेडन षटके टाकली. जेम्स अँडरसनने त्याच्या या मोठ्या कारकिर्दीत अनेक विविध विक्रम आपल्या नावे केले आहेत. १८८ कसोटी सामने खेळणारा अँडरसन हा जगातील पहिला वेगवान गोलंदाज आहे. पण आता अँडरसनने त्याच्या अखेरच्या कसोटीत एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.

हेही वाचा – James Anderson: कोणासमोर गोलंदाजी करणं अवघड? ‘या’ दिग्गज भारतीय खेळाडूचं नाव घेत अँडरसन म्हणाला…

James Anderson Said Sachin Tendulkar The Best Batter to Bowled
James Anderson: कोणासमोर गोलंदाजी करणं अवघड? ‘या’ दिग्गज भारतीय खेळाडूचं नाव घेत अँडरसन म्हणाला…
vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”
Kuldeep Yadav Marriage
कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…
Yashasvi Jaiswal equals Rohit Sharma record
IND vs SL : रोहितला जे करायला १७ वर्षं लागली, ते यशस्वीने केवळ ११ महिन्यांत करुन दाखवलं; जाणून घ्या काय आहे विक्रम?
Tillotama Shome faced terrifying incident in delhi
“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, बॉलीवूड अभिनेत्रीला मदत मागितल्यावर कारमध्ये आला भयंकर अनुभव
Video viral of elderly man denied entry at mall for wearing dhoti in Bangalore
धोतर नेसलं म्हणून वयोवृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; VIDEO VIRAL होताच घडली जन्माची अद्दल, पाहा नेमकं काय झालं?
Why West Indies Did Not Give Guard of Honour to James Anderson
ENG vs WI: जेम्स अँडरसनला वेस्ट इंडिज संघ ‘गार्ड ऑफ ऑनर’ देणार होता पण… खेळाडूने सांगितलं मैदानात नेमकं काय घडलं?
Puneri pati viral Puneri Old Man Punctures Car Tyre For Parking In His Spot Funny Video
पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना घडवली जन्माची अद्दल, आजोबांचा VIDEO पाहून पोट धरुन हसाल

जेम्स अँडरसनने वेस्ट इंडिजविरुद्ध दहावे षटक टाकून इतिहास रचला आहे. १८८ कसोटी सामन्यांमध्ये अँडरसनने गोलंदाजी करताना ४० हजार चेंडू टाकले आहेत. क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून तब्बल ४० हजार चेंडू टाकणारा अँडरसन पहिला खेळाडू ठरला. याशिवाय त्याने मुथय्या मुरलीधरन, अनिल कुंबळे आणि शेन वॉर्नच्या खास यादीतही स्थान मिळवले. अँडरसनच्या आधी श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन, भारताचा अनिल कुंबळे आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४० हजार चेंडू टाकले होते. पण हे तिघेही फिरकी गोलंदाज होते. तर अँडरसन हा वेगवान गोलंदाज आहे.

हेही वाचा – Ben Stokesने कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास, इंग्लंडसाठी ही कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

James Andersonने कसोटी क्रिकेटमध्ये ४० हजार चेंडू टाकण्याचा पराक्रम केला. अँडरसनच्या आधी ही कामगिरी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन, अनिल कुंबळे आणि शेन वॉर्न यांनी केले होते. आता अँडरसन या सर्व माजी महान गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे तर मुरलीधरन पहिल्या स्थानावर आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये ४० हजार किंवा त्याहून अधिक चेंडू टाकणारे गोलंदाज

४४०३९ – मुथय्या मुरलीधरन
४०८५० – अनिल कुंबळे
४०७०५ – शेन वॉर्न
४०००१ – जेम्स अँडरसन

हेही वाचा – ENG vs WI: जेम्स अँडरसनला वेस्ट इंडिज संघ ‘गार्ड ऑफ ऑनर’ देणार होता पण… खेळाडूने सांगितलं मैदानात नेमकं काय घडलं?

जेम्स अँडरसन कसोटीत ४० हजार चेंडू टाकणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला. या यादीत ३३६९८ चेंडू टाकणारा अँडरसनचा सहकारी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या स्थानावर आहे तर कर्टनी वॉल्श तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत ग्लेन मॅकग्रा चौथ्या तर कपिल देव पाचव्या क्रमांकावर आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू टाकणारे वेगवान गोलंदाज

४०००० – जेम्स अँडरसन (लेखनाच्या वेळी)
३३६९८ – स्टुअर्ट ब्रॉड
३००१९ – कोर्टनी वॉल्श
२९२४८ – ग्लेन मॅकग्रा
२७७४० – कपिल देव