दक्षिण आफ्रिकेतील बॉल टॅम्परिंगच्या घटनेला चार वर्षे उलटून गेली आहेत. पण त्याबाबतच्या बातम्या वेळोवेळी येत असतात. या एपिसोडमध्ये आता डेव्हिड वॉर्नरच्या मॅनेजरने एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की बॉल टॅम्परिंगच्या घटनेत तीनपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता, पण डेव्हिड वॉर्नरने त्या सर्वांना वाचवले आणि सर्व दोष स्वतःवर घेतला. वॉर्नरचे व्यवस्थापक जेम्स अरिस्किन यांच्या म्हणण्यानुसार, वॉर्नरने त्या लोकांना वाचवले आणि दोष स्वतःवर घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर, डेव्हिड वॉर्नरने अलीकडेच बॉल टेम्परिंगमुळे कर्णधारपदावरील आजीवन बंदीविरोधात अपील केले होते. मात्र, आता त्याने आपली अपील मागे घेतली आहे. यानंतर त्याचे मॅनेजर जेम्स अरिस्किन यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे.

सेन ११७० शी झालेल्या संभाषणात जेम्स म्हणाला, ”बॉल टॅम्परिंगच्या घटनेत तीनहून अधिक लोक सामील होते. वॉर्नरने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला वाचवले. तसेच माझ्या सल्ल्यानुसार त्याच्या सहकारी खेळाडूंनाही वाचवले. कारण अशा बातम्या कोणीही ऐकू इच्छित नाही. सत्य नक्कीच बाहेर येईल.”

जेम्स म्हणाला पुढे म्हणाला, ”दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवावर दोन वरिष्ठ अधिकारी ड्रेसिंग रूममध्ये संघावर टीका करत होते. वॉर्नर म्हणाला की, आम्हाला रिव्हर्स स्विंगची गरज आहे. जेव्हा चेंडूशी छेडछाड केली जाते, तेव्हाच चेंडू रिव्हर्स स्विंग होऊ शकतो आणि त्यांनी तसे करण्यास सहमती दर्शविली.”

हेही वाचा – ‘सरफराज असो किंवा बाबर, इतरांच्या नादात ते मलाचं ऐकवतात’, शादाब खानचा कॅमेरासमोर खुलासा, पाहा व्हिडिओ

२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढळले होते. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथवर प्रत्येकी एक वर्षाची बंदी घातली होती. त्याचबरोबर बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणात डेव्हिड वॉर्नरची भूमिका सर्वाधिक होती. याच कारणामुळे डेव्हिड वार्नरच्या कर्णधारपदावरही आजीवन बंदी घालण्यात आली होती.