इंडियन सुपर लीगमधील जमशेदपूर क्लबचा प्रमुख आक्रमणपटू
इंडियन सुपर लीगमधील पदार्पणात जमशेदपूर एफसीची वाटचाल सर्वाना थक्क करणारी आहे. १४ सामन्यांमध्ये त्यांनी सहा विजय मिळवले, तर चार सामने अनिर्णित राखले. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी गुणतालिकेत २२ गुणांसह चौथे स्थान पटकावले आहे. जमशेदपूरच्या या वाटचालीत मुंबईच्या अंबरनाथ येथील खेळाडूचा महत्त्वाचा वाटा आहे. फारुख चौधरी असे या खेळाडूचे नाव असून तो क्लबचा प्रमुख आक्रमणपटू आहे. गोलतालिकेत त्याच्या नावावर एकही गोल नसला तरी प्रतिस्पर्धी बचावपटू आणि गोलरक्षक यांना सतत व्यग्र राखण्याची जबाबदारी तो चोखंदळपणे पार पाडत आहे. फारुखचा जमशेदपूपर्यंतचा प्रवास आपल्याला भारताची भ्रमंती करवणारा आहे. फुटबॉलचे प्रशिक्षण मिळावे यासाठी सुरुवातीला त्याचा अंबरनाथ ते दक्षिण मुंबई किंवा बोरिवली असा प्रवास सुरू असायचा. त्यानंतर तो थेट जम्मू-काश्मीर, पुणे, केरळ अशी भ्रमंती करत जमशेदपूपर्यंत येऊन ठेपला आहे.
‘‘हा प्रवास सोपा नक्की नव्हता. शालेय स्तरावर असताना अंबरनाथ ते दक्षिण मुंबई कधी कधी बोरिवली असा आठवडय़ातून ३-४ दिवस प्रवास करावा लागायचा. अंबरनाथमध्ये फुटबॉलसाठी सुविधा नसल्याने ही ओढाताण सुरू होती. पण स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी एवढी मेहनत घ्यावी लागेलच. येथील स्थानिक डायमंड क्लबकडून मी सुरुवात केली. त्यानंतर मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघात खेळण्याची संधी मिळाली. हा प्रवास येथेच थांबला नाही. जम्मू-काश्मीरच्या लोनस्टार काश्मीर एफसीचे आय-लीग दुसऱ्या विभागीय स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. तेथील कामगिरीच्या जोरावर आयएसएलमधील केरळ ब्लास्टर्सने मला करारबद्ध केले आणि तेथून कारकीर्दीला कलाटणी मिळाली,’’ असे फारुख सांगत होता.
मुंबई सिटी एफसीविरुद्धच्या लढतीत फारुखने उल्लेखनीय खेळाने सर्वाची वाहवा मिळवली. अंधेरी क्रीडा संकुलावर झालेल्या या लढतीसाठी त्याचा मित्रपरिवार आणि कुटुंबही उपस्थित होते. त्यांच्या पाठिंब्यामुळे फारुखचे मनोबल अधिक उंचावले. मुंबईविरुद्ध खेळताना थोडासा भावनिक झाला होतास का, या प्रश्नावर तो म्हणाला, ‘‘घरच्या क्लबकडून खेळण्याची प्रत्येकाची इच्छा असते, परंतु मुंबईविरुद्ध भावनिक अजिबात नव्हतो. माझ्या क्लबला तीन गुण मिळवून देण्याचा माझा निर्धार होता आणि त्यासाठी मी संपूर्ण
ताकदीने खेळ केला. येथे भावनेला थारा दिला असता तर खेळ उंचावला नसता.’’
आई-वडील, लहान बहीण असा फारुखचा छोटासा परिवार आहे. वडील एअर इंडियात कामाला होते, परंतु कुठल्याही वरच्या पदावर नाही. दैनंदिन व्यवहारात करावी लागणारी कसरत चौधरी कुटुंबीयांनाही करावी लागली. मात्र फारुखच्या यशाने त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे. भविष्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्धार फारुखने व्यक्त केला आहे आणि त्यासाठी अथक परिश्रम घेण्याचीही त्याची तयारी असल्याचे त्याने सांगितले.