भुवनेश्वर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Hockey World Cup 2023 ओडिशा येथे सुरू असलेली विश्वचषक हॉकी स्पर्धा अनाकलनीय घटनांनी चर्चेत आहे. स्पर्धेत मंगळवारी कोरियाविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या सत्रात जपानचे १२ खेळाडू मैदानात होते. ही घटना लक्षात आल्यावर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने याची चौकशी करण्याची तयारी दाखवली आहे.

ब-गटातील या सामन्यात कोरियाने जपानचा २-१ असा पराभव केला. सामन्याच्या अखेरच्या सत्रात जपानचे १२ खेळाडू खेळले. या घटनेची आंतरराष्ट्रीय महासंघाकडून चौकशी होणार असली, तरी सामन्याचा निकाल बदलणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जपान संघ व्यवस्थापनाने सामन्यानंतर आपली चूक मान्य करताना माफी मागितली आहे.

हॉकी महासंघाच्या नियमाप्रमाणे, सामन्यात ११ खेळाडूच खेळू शकतात. जपानने १२ खेळाडू कसे खेळवले हा चर्चेचा विषय ठरला आहे. सलग दुसऱ्या दिवशी विश्वचषक स्पर्धेत अनाकलनीय घटना घडली. सोमवारी न्यूझीलंडने नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याला सुरुवात करतानाच गोलरक्षकाला वगळण्याचा निर्णय घेतला होता.मंगळवारी झालेल्या अन्य सामन्यात गतविजेत्या बेल्जियमला जर्मनीने २-२ असे बरोबरीत रोखले.