टोक्यो : भारताच्या एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन तसेच, सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ७५० दर्जा) उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लक्ष्यने जपानच्या कांटा सुनेयामाला २१-१४, २१-१६ असे पराभूत केले. पुढच्या फेरीत लक्ष्यसमोर जपानच्या कोकी वाटानाबेचे आव्हान असेल. पुरुष एकेरीच्या अन्य सामन्यात प्रणॉयने आपल्या देशाच्या किदम्बी श्रीकांतवर १९-२१, २१-९, २१-९ असा विजय नोंदवला. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना डेन्मार्कच्या अग्रमानांकित विक्टर अ‍ॅक्सेलसेनशी होणार आहे.

कोरियन खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील विजेता सात्त्विक व चिराग जोडीने डेन्मार्कच्या लास्से मोल्हेडे आणि जेप्पे बे जोडीला २१-१७, २१-११ असे नमवले. पुढच्या फेरीत भारतीय जोडीसमोर चायनीज तैपेइच्या ली यांग व वांग ची लिनचे आव्हान असेल.