ओसाका : भारताच्या एचएस प्रणॉयने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या चायनीज तैपेईच्या चोऊ टिएन चेनकडून हार पत्करली. त्यामुळे भारताचे जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
चेनने प्रणॉयला २१-१७, १५-२१, २२-२० असे हरवले. शेवटच्या निर्णायक गेममध्ये प्रणॉयने तीन मॅच पॉइंट वाचवले, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. प्रणॉयने चेनसमोर आव्हान उपस्थित केले,मात्र चेनने सातत्याने गुणांची कमाई करत गेम २१-१७ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने २१-१५ असा विजय मिळवला. निर्णायक गेममध्ये चेनने गुणांची कमाई करणे सुरूच ठेवले आणि अखेर चेनने गेम २२-२० असा जिंकला.