टोक्यो : भारताचा तारांकित बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला झुंजार खेळानंतरही शनिवारी इंडोनेशियाच्या पाचव्या मानांकित जॉनथन क्रिस्टीकडून तीन गेमपर्यंत चाललेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याचे जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील (सुपर ७५० दर्जा) आव्हान संपुष्टात आले.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता आणि जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानी असणाऱ्या लक्ष्यने पहिला गेम गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन केले. मात्र, जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असणारा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या क्रिस्टीकडून त्याला १५-२१, २१-१३, १६-२१ अशी हार पत्करावी लागली.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Anuj Rawat leave Delhi Team and join Gujarat Titans camp ahead IPL 2025 season
Anuj Rawat : आयपीएलला प्राधान्य देणे ‘या’ खेळाडूला पडणार महागात, गुजरात टायटन्ससाठी रणजी संघाची सोडली साथ
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
Senior advocate Iqbal Chagla passes away
अन्वयार्थ : गोड बोलण्यापेक्षा, न्यायाचे बोला!

लक्ष्यने या महिन्याच्या सुरुवातीला कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे (सुपर ५०० दर्जा) जेतेपद मिळवले होते. तसेच, लक्ष्य आणि क्रिस्टी यांची एकमेकांविरुद्धची कामगिरी १-१ अशी होती. त्यामुळे या सामन्यात चुरस अपेक्षित होती आणि तसेच झाले. दोन्ही खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले. क्रिस्टीने पहिल्या गेममध्ये सुरुवातीला चुका केल्या आणि याचा फायदा घेत लक्ष्यने ७-४ अशी आघाडी घेतली. यानंतर क्रिस्टीने बरोबरी साधली. क्रिस्टीने मध्यंतरानंतर आपला खेळ उंचावला आणि १५-१२ अशी आघाडी घेतली. यानंतर त्याने चांगला खेळ सुरू ठेवत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेमच्या सुरुवातीला लक्ष्यला संघर्ष करावा लागला, पण पुढे त्याला लय सापडली. त्याने काही चांगल्या फटक्यांसह दुसऱ्या गेमच्या मध्यापर्यंत ११-५ अशी आघाडी मिळवली. आपली हीच लय पुढेही कायम राखत त्याने दुसरा गेम जिंकत सामना बरोबरीत आणला.

निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चांगले द्वंद्व पाहायला मिळाले. मात्र, क्रिस्टीने खेळावर नियंत्रण मिळवताना ९-६ अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर लक्ष्यने आघाडी १३-१७ अशी केली. मात्र, क्रिस्टी जोरदार स्मॅशच्या मदतीने २०-१५ अशी आघाडी घेत पाच ‘मॅच पॉइंट’ मिळवले. लक्ष्यने एक ‘मॅच पॉइंट’ वाचवला. मात्र, पुढील फटका नेटवर लागला व क्रिस्टीने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

लक्ष्यच्या पराभवामुळे भारताचेही या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. एकेरीत एचएस प्रणॉय, तर दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करता आला नव्हता.

Story img Loader