टोक्यो : करोना साथीच्या काळातही होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेसाठी यजमान जपानचे महापथक सज्ज झाले आहे. या चमूत विक्रमी ५८२ क्रीडापटूंशिवाय अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

टोक्योत झालेल्या कार्यक्रमाला काही ऑलिम्पिकपात्र क्रीडापटूंसह जपान ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष यसुहिरो यामाशिता, पथकप्रमुख त्सुयोशी फुकुई व महाव्यवस्थापक मित्सुगी ओगाटा उपस्थित होते. तसेच  ऑलिम्पिक पथकामधील जवळपास ८०० सदस्यांनी ऑनलाइन हजेरी लावली. पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी ऑनलाइन माध्यमातून पथकाला शुभेच्छा देताना म्हटले की, ‘‘जगभरातील क्रीडापटूंचा समावेश असलेले ऑलिम्पिक सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आम्ही सर्व उपाययोजनांसह सज्ज आहोत.’’ या कार्यक्रमाला टेनिसपटू नाओमी ओसाकासुद्धा उपस्थित होती. १९६४च्या टोक्यो आणि २००४च्या अ‍ॅथेन्स ऑलिम्पिक स्पर्धामध्ये जपानने सर्वाधिक १६ पदके जिंकण्याची किमया साधली होती. यंदा ३० पदकांचे लक्ष्य त्यांनी जोपासले आहे. १९६४च्या ऑलिम्पिकला जपानच्या पथकात सर्वाधिक ३५५ क्रीडापटूंचा समावेश होता.

Story img Loader