Jason Gillespie on Pakistan Cricket Board: पाकिस्तानच्या कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्यानंतर आपल्या पहिल्याच मुलाखतीत जेसन गिलेस्पीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाबद्दल (PCB) मोठं वक्तव्य केलं आहे. पीसीबीला आपण कोच म्हणून राहू नये असे त्यांना वाटत होते. बोर्डाशी संवादाचा अभाव आणि सहाय्यक प्रशिक्षक टिम निल्सन यांची हकालपट्टी ही त्यांनी राजीनामा दिल्याची कारणं असल्याचे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गिलेस्पी आणि टिम निल्स ला पीसीबीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता आणि त्यांना वाटले की ते योग्य दिशेने जात आहेत. कसोटी कर्णधार शान मसूद याच्याशी त्याचे चांगले संबंध होते आणि त्यांच्यातील प्रशिक्षक-खेळाडूचे नातेही घट्ट होते. ऑक्टोबरमध्ये इंग्लंडविरुद्ध २-१ असा विजय मिळवला, तर पाकिस्तान पहिल्या सामन्यात एक डाव आणि ४७ धावांनी पराभूत झाला. पराभवानंतर, गिलेस्पी यांना सांगितलं की त्यांना एका चॅट ग्रुपमध्ये अॅड केले होते त्यावर एक मेसेज मिळाला होता, ज्यात म्हटलं होतं की एक नवीन निवड समिती तयार होत आहे, पण गिलेस्पी संघाचे कोच असूनही त्यांना याचा भाग होता येणार नाही.

हेही वाचा – WTC Final Scenario: गाबा कसोटी गमावल्यानंतर भारत WTC 2025 फायनलच्या शर्यतीतून होणार बाहेर?

गिलेस्पी म्हणाले, “मला वाटते की मुख्य प्रशिक्षक म्हणून तुम्हाला तुमच्या बोर्डाशी स्पष्ट संवाद साधणं महत्त्वाचं असतं. टीम नील्सन यांना बोर्डाकडून सांगण्यात आले की त्यांनी यापुढे या पदावर काम करण्याची आवश्यकता नाही आणि मला याबद्दल काहीच सांगितले गेले नाही. मला असं वाटतं की गेल्या काही महिन्यांत घडलेल्या इतर बऱ्याच गोष्टींनंतर, कदाचित हाच तो क्षण असेल जेव्हा मला असे वाटले की त्यांना मी मुख्य प्रशिक्षक पदाच्या भूमिकेत संघाबरोबर असावे की नाही हे त्यांना स्पष्ट नव्हते.”

हेही वाचा – NZ vs ENG: केन विल्यमसनने शतकासह घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज

सामन्याच्या एक दिवस अगोदरच संघातील खेळाडूंची माहिती गिलेस्पी यांना मिळत असे. त्यामुळे गिलेस्पी यांना प्रशिक्षक म्हणून आपली भूमिकेवर गदा आल्याचं त्यांना जाणवलं. याचबरोबर निवडकर्ते पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्याशी थेट संवाद होत नसल्याने आणि हळूहळू संघाबाबत सर्वच गोष्टींतून वगळल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

हेही वाचा – Jasprit Bumrah: “गुगल करून रेकॉर्ड बघ…”, बुमराहने आपल्या फलंदाजी कौशल्यावर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला दिलं सडेतोड उत्तर; नेमकं काय घडलं?

यापूर्वी गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तानच्या वनडे आणि टी-२० संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी ४ महिन्यांत संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. आता जेसन गिलेस्पीनेही राजीनामा दिला आहे. तर पाकिस्तान संघ आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टिम निल्सन यांना पदावरून काढल्यानंतर जेसन गिलेस्पीही पदाचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jason gillespie statement on pakistan cricket board slams pcb and details reason about resignation bdg