विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकतच विंडीजच्या संघावर विजय मिळवला. सर्वात प्रथम टी-२०, त्यानंतर वन-डे आणि कसोटी मालिकेतही भारतीय संघाने बाजी मारली. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सध्याचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करत सर्वांना आपल्या कामगिरीची दखल घ्यायला भाग पाडलं आहे. दोन कसोटी सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराहने १३ बळी घेतले. या कामगिरीच्या जोरावर जसप्रीतने कसोटी क्रमवारीत आपलं सर्वोत्तम स्थान मिळवलं आहे.

आतापर्यंत बुमराह केवळ १२ कसोटी सामने खेळला आहे. मात्र या प्रत्येक १२ सामन्यानंतर त्याची कसोटी क्रिकेटमधली क्रमवारी पाहिली तर त्याच्या प्रगतीचा आलेख हा किती चांगला आहे याची आपल्याला कल्पना येईल.

याचसोबत इतर दिग्गज भारतीय गोलंदाजांच्या तुलनेत बुमराहने केलेली कामगिरी ही नक्कीच वाखणण्याजोगी आहे.

विंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ टी-२० आणि ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात टी-२० संघात बुमराहची निवड झालेली नाहीये.

Story img Loader