वेस्ट इंडिजविरुद्ध जमैका येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने हॅटट्रीकचीही नोंद केली. मात्र बुमराहच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर वेस्ट इंडिजचे माजी जलदगती गोलंदाज आणि या मलिकेतील समालोचक इयान बिशप यांनी बुमराहच्या गोलंदाजीबद्दल वादग्रस्त मत व्यक्त केले. “बुमराहच्या गोलंदाजीच्या शैलीवर ‘काहीजण’ आक्षेप घेतात” असं बिशप म्हणाले. मात्र त्याचवेळी तेथे उपस्थित असणारे भारताचे माजी फलंदाज आणि सध्या या मालिकेमध्ये समालोचक असणाऱ्या सुनिल गावस्कर यांनी यावरुन बिशप यांना चांगलेच सुनावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्राव्हो, ब्रूक्स आणि रोस्टन चेस या तिन्ही फलंदाजांना माघारी धाडत बुमराहने हॅटट्रीकचीही नोंद केली. कसोटी क्रिकेटमधील ही 44 वी हॅटट्रीक ठरली. तर असा पराक्रम करणारा बुमराह हा तिसरा भारतीय ठरला. याआधी हरभजन सिंहने २००१ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध, इरफान पठाणने २००६ साली पाकिस्तानविरुद्ध सामन्यात हॅटट्रीक नोंदवली होती. ‘काहीजण बुमराहच्या गोलंदाजीच्या शैलीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतात यावर माझा विश्वास बसत नाही,’ असे खोचक वक्तव्य बिशप यांनी बुमराहने हॅटट्रीक घेतल्यावर व्यक्त केले. ‘त्याची शैली वेगळी आहे पण ती नियमांमध्ये बसणारी आहे. खरंतर ही एक उत्तम शैली आहे. त्याच्यावर टिका करणाऱ्यांनी एकदा स्वत:कडे पाहण्याची गरज आहे,’ अशी सारवासारव नंतर बिशप यांनी केली.

याच मुद्द्यावरुन बिशप यांच्या शेजरी बसलेल्या गावस्कर यांनी ‘बुमराहवर कोण टीका करतं त्यांची नावं सांगू शकता का तुम्ही?,’ असं बिशप यांना विचारलं. मात्र बिशप यांनी सोयीस्करपणे हा प्रश्न टाळला आणि दोघेही नंतर बुमराहच्या गोलंदाजीच्या शैलीबद्दल बोलू लागले. ‘नीट बघूयात… काही पावलं चालतं आल्यावर तो धावू लागतो आणि सरळ हाताने चेंडू फेकतो. आता मला सांगा कुठे त्याचा हात वाकलेला दिसतो? ही अगदी योग्य शैली आहे. लोकांनी खरचं सुधरण्याची गरज आहे,’ असा टोला गावस्कर यांनी बिशप यांचे नाव न घेता लगावला.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक टिपणारा तिसरा भारतीय ठरण्याचा मान बुमराहला मिळाला. पण या मान त्याला विराट कोहलीमुळे मिळाला असून ही हॅटट्रिकदेखील कोहलीचीच आहे, असे एक विधान त्याने दिवसाचा खेळ संपल्यावर केले. विराट बुमराहची अनौपचारिक मुलाखत घेत असताना त्याने हे कबुल केले. विराटच्या हॅटट्रिकच्या प्रश्नाला उत्तर देताना बुमराह म्हणाला, “दोन गडी बाद झाल्यावर मी जेव्हा तिसरा चेंडू टाकला, तेव्हा तो चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागून मग पॅडला लागला आहे असे मला वाटले. त्यामुळे मी चेंडू टाकून झाल्यावर अपील देखील केले नव्हते. पण कर्णधार म्हणून तू (विराट) रिव्ह्यूची मागणी केलीस आणि सुदैवाने ‘डीआरएस’मध्ये तो फलंदाज बाद ठरवण्यात आला. त्यामुळे खरं पाहता ही हॅटट्रिक कर्णधाराचीच आहे.”