IND vs AUS Jasprit Bumrah Akashdeep Partnership: गाबा कसोटीत भारताच्या गोलंदाजांनी बॅटने चमकदार कामगिरी करत टीम इंडियासाठी मोठी भूमिका बजावली. भारतासाठी १०व्या आणि ११व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेले जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांनी चौथ्या दिवसाच्या अखेर ३९ धावांची भागीदारी करत भारताचा फॉलोऑन टाळला. चौथ्या दिवसाअखेर टीम इंडियाने ९ गडी गमावून २५२ धावा केल्या होत्या. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर दोघांनी काही धावांची भर घालून आकाशदीप बाद झाला आणि ४७ धावांची महत्त्वूर्ण भागीदारी करत टीम इंडिया २६० धावांवर सर्वबाद झाली.

भारतीय संघ ९ बाद २१३ धावांवर असताना जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप फलंदाजी करत होते. यानंतर या दोघांनी एखाद्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजाप्रमाणे बचावात्मक फलंदाजी करत भारताचा डाव पुढे नेला. संधी मिळताच या दोघांनी फटकेबाजीही केली. पाचव्या दिवशी आकाशदीप ट्रॅव्हिस हेडच्या गोलंदाजीवर स्टंपिग होऊन बाद झाल्याने ही महत्त्वपूर्ण ४७ धावांची भागीदारी तुटली. पण या दोघांनी फक्त भारताचा फॉलोऑनच टाळला नाहीतर एक मोठा विक्रमही आपल्या नावे केला आहे.

Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Jasprit Bumrah Wins ICC Mens Player of the Month for December 2024 For exceptional performances in IND vs AUS test Series
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने पटकावला ICC चा खास पुरस्कार, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पाहिला गोलंदाज
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Sam Konstas Admits Provoking Jasprit Bumrah in Sydney Test which Leads to Usman Khwaja Wicket Said My Fault
Bumrah Konstas Fight: “हो माझी चूक होती…”, बुमराहशी मुद्दाम वाद घातल्याचे कॉन्स्टासने केलं मान्य; म्हणाला, “माझ्यामुळे ख्वाजा…”
Loksatta anvyarth Gautam Gambhir India lose in Test series
अन्वयार्थ: खरेच ‘गंभीर’ आहोत?

हेही वाचा – IND vs AUS: आकाशदीपचा गगनचुंबी षटकाराने खुद्द विराटला केलं चकित, भन्नाट प्रतिक्रिया देत कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये मारली उडी; VIDEO व्हायरल

बुमराह-आकाशदीपने घडवला इतिहास

भारताच्या या दोन्ही फलंदाजांनी आपल्या डावात दणदणीत षटकार लगावले. बुमराहने १० धावांच्या खेळीत शानदार षटकार ठोकला. आकाश दीपनेही ३१ धावा करताना २ चौकार आणि १ षटकार लगावला. यासह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ७७ वर्षांच्या कसोटी इतिहासात प्रथमच टीम इंडियाच्या १०व्या आणि ११व्या क्रमांकाच्या फलंदाजाने षटकार लगावण्याचा पराक्रम केला आहे. याआधी १०व्या आणि ११व्या क्रमांकाच्या फलंदाजाने कांगारू संघाविरुद्ध कधीही अशी कामगिरी केली नव्हती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९४७ मध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला होता.

हेही वाचा – IND vs AUS: आकाशदीपचा चौकार अन् गंभीर-विराटचं आक्रमक सेलिब्रेशन, भारताने फॉलोऑन टाळताच ड्रेसिंग रूममधील VIDEO व्हायरल

भारताविरुद्धच्या गाबा कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने दमदार कामगिरी केली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ४४५ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाची अवस्था बिकट झाली. भारताची टॉप ऑर्डर ५० धावा करण्याच्या आतच कोसळली. जडेजा (७७) आणि केएल राहुलच्या (८४) शानदार खेळीच्या जोरावर भारताने चांगलं पुनरागमन केलं पण फॉलोऑनचा धोका मात्र संघावर होता. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर बुमराह आणि आकाशदीपने आपली कामगिरी चोख बजावली.

हेही वाचा – IND vs AUS: भारताचा फॉलोऑन टळला! बुमराह-आकाशदीपच्या जोडीने जीवाची लावली बाजी, जडेजा-राहुलने रचला होता पाया

गाबा कसोटीच्या पाचव्या दिवशी टीम इंडिया २६० धावांवर सर्वबाद झाली. यासह ऑस्ट्रेलियाकडे आता एकूण १८५ धावांची आघाडी आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू होणारच होता तितक्यात आकाशात ढग दाटून आले आणि एकच अंधार पसरला. काही वेळानंतर पावसाला सुरूवात झाली असून पुढील खेळ सुरू होण्यासाठी वेळ लागत आहे.

Story img Loader