यूएईमधील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. या स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान सुपर-४ फेरीमध्येच संपुष्टात आले. दरम्यान, आता यूएई स्पर्धेनंतर पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया येथे खेळवल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेकडे भारतीय संघ आणि व्यवस्थापनाने आपला मोर्चा वळवला आहे. लवकरच टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. मात्र त्याधीच एक खुशखबर आली आहे. भारताचे दोन दिग्गज खेळाडू दुखापतीतून सावरले असून ते संघात परतण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> उर्वशी रौतेलाचं पाकिस्तानी खेळाडूसोबत जोडलं जातंय नाव; चर्चेला उधाण आल्यानंतर दिलं स्पष्टीकरण; म्हणाली “माझ्या…”
भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून सावरले आहेत. तसे वृत्त क्रिकबझ या क्रीडविषयक वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे. या वृत्तानुसार जसप्रित बुमराह आणि हर्षल पटेल हे दोखेही दुखापतीतून सावरले असून त्यांनी फिटनेस टेस्टमध्येही विनाअडथळा गोलंदाजी केली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघामध्ये या दोघांचा समावेश केला जाऊ शकतो.
हेही वाचा >>> Video : पाकिस्तानच्या खेळाडूने हे काय केलं ? प्रेक्षकांचे मोबाईल थेट खिशात घातले; पाहा नेमकं काय घडलं?
दरम्यान, आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिया येथे आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेला १५ ऑक्टोब पासून सुरुवात होणार असून अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. तर येत्या १५ सप्टेंबरपर्यंत खेळाडू निवड समितीची बैठक आयोजित केली जाणार असून या विश्वचषकासाठी भारतीय संघामध्ये कोणत्या खेळाडूंचा सामावेश असेल, हे ठरवले जाण्याची शक्यता आहे.