Jasprit Bumrah and Smriti Mandhana Won ICC Player of the Month Award : टीम इंडियाला टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावणारा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आता आणखी एक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराहने जून महिन्याच्या आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारावर नाव कोरलं आहे. त्याने रोहित शर्मा आणि रहमानुल्ला गुरबाज यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. त्याचबरोबर महिला क्रिकेटमध्ये हा पुरस्कार स्मृती मानधनाने पटकावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर –

जसप्रीत बुमराहला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जसप्रीत बुमराहने याआधी टी-२० विश्वचषकातही प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला होता. त्याने टी-२० विश्वचषकात ८.२६ च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या. यावेळी त्याची इकॉनॉमी ४.१७ च्या आसपास होती. त्याने गट टप्प्यातील सामन्यासह सुपर-८ फेरीत शानदार गोलंदाजी केली.

जसप्रीत बुमराहने सुपर-८ फेरीतील तीन सामन्यांत एकूण सहा विकेट्स घेतल्या. यानंतर बुमराहने १२ धावांत २ विकेट्स घेत भारताला इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत विजय मिळवून दिला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बार्बाडोसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात त्याने केवळ १८ धावांत दोन फलंदाजांना बाद केले होते. आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ जूनसाठी रोहित शर्मा आणि रहमानउल्ला गुरबाज यांनाही नामांकन मिळाले होते.

बुमराहने रोहित आणि गुरबाजचेही केले अभिनंदन –

पुरस्कार जिंकल्यानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला, ‘जून महिन्याचा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये काही संस्मरणीय आठवडे घालवल्यानंतर माझ्यासाठी हा विशेष सन्मान आहे. एक संघ म्हणून आमच्याकडे खूप चांगल्या आठवणी आहेत. आता वैयक्तिक सन्मान मिळाल्याने मी आनंदी आहे. या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील. रोहित भाई आणि रहमानउल्ला गुरबाज यांचेही अभिनंदन करू इच्छितो. शेवटी, मी माझे कुटुंब, माझे सर्व सहकारी आणि प्रशिक्षक तसेच मला ‘वोट’ करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानू इच्छितो.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrah and smriti mandhan have won the icc player of the month award for the month of june vbm