BCCI Awards 2023-2024 Updates : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना यांनी बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कारांवर वर्चस्व राखले आहे. बुमराह आणि मंधाना यांना २०२३-२४ साठी सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटूचा पुरस्कार दिला जाणार आहे. पुरुष गटात सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून बुमराहची, तर महिला गटात मंधानाची सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र, बीसीसीआयने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुमराहला अलीकडेच आयसीसीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले, तर त्याला सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडू म्हणूनही निवडण्यात आले होते. बुमराहने गेल्या वर्षी चमकदार कामगिरी केली होती आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये तो मालिकावीर ठरला होता. त्याने या मालिकेत सर्वाधिक ३२ विकेट्स घेतल्या होत्या.

जसप्रीत बुमराहची २०२३-२४ मधील कामगिरी –

जसप्रीत टी-२० विश्वचषक २०२४ च्या स्पर्धेत ८.२६ च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या होत्या. भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले, त्यात बुमराहचे योगदानही महत्त्वाचे ठरले. बुमराहला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. बुमराह २०२४ मध्ये कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे. त्याने १३ सामन्यांमध्ये १४.९२ च्या सरासरीने आणि ३०.१६ च्या स्ट्राइक रेटने ७१ विकेट्स घेतल्या, जी पारंपारिक फॉरमॅटमधील कोणत्याही गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे.

स्मृती मंधानाची २०२३-२४ मधील कामगिरी –

दुसरीकडे, स्मृती मंधानाला आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २८ वर्षीय मंधाना २०२४ मधील सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. मंधानाने २०२४ कॅलेंडर वर्षात ७४३ धावा केल्या होत्या आणि चार एकदिवसीय शतके झळकावली होती, जो महिला क्रिकेटमधील एक विक्रम आहे. तिने गेल्या वर्षी १०० हून अधिक बाऊंड्री मारल्या. ज्यात ९५ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.

२८ वर्षीय मंधानाने एकदिवसीय सामन्यांमध्ये ५७.८६ च्या सरासरीने आणि ९५.१५ च्या प्रभावी स्ट्राइक रेटने धावा केल्या. मंधानाने२०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होती. चार शतकांव्यतिरिक्त, मंधानाने २०२४ मध्ये तीन अर्धशतकेही केली होती. या काळात तिची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या १३६ धावा होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrah and smriti mandhana likely get award for best international cricketer 2023 24 in bcci awards vbm