Jasprit Bumrah at Coldplay Concert Video: भारतात सध्या कोल्डप्ले बँडच्या कॉन्सर्टने धुमाकूळ घातला आहे. अनेक चाहत्यांबरोबरच भारतीय क्रिकेटपटू, सेलिब्रिटी सर्वांनीच या कॉन्सर्टला हजेरी लावली. भारताचा स्टार क्रिकेपटू जसप्रीत बुमराहने देखील रविवारी २६ जानेवारी रोजी भारतात कोल्डप्लेच्या अंतिम कॉन्सर्टला हजेरी लावली. बुमराह अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित होता. ब्रिटीश बँड कोल्डप्लेचा प्रमुख गायक ख्रिस मार्टिन याने बुमराहसाठी एक खास गाणं देखील गायले.

मुंबईत झालेल्या कॉन्सर्टमध्ये कोल्डप्लेमध्ये ख्रिस मार्टिनने बुमराहची खास आठवण काढली होती. पण अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये जेव्हा टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा बँड पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बुमराहसह त्याची आई आणि मोठी बहीणही उपस्थित होते. चाहत्यांनी बुमराहला पाहताच स्टेडियममध्ये एकच जल्लोष सुरू केला. इतकंच नव्हे तर स्टेजवर जसप्रीत बुमराहची खास ऑटोग्राफ असलेली जर्सीदेखील बँडने ठेवली होती.

Uday Samant on chhava movie
Chhava Movie Controversy : अखेर छावा चित्रपटातला ‘तो’ वादग्रस्त भाग काढला; मंत्री उदय सामंत म्हणाले…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Protest by a pro-Khalistan mob outside the Indian High Commission in London met counter-protest
Video : लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांना भारतीयांनी दिलं सडेतोड उत्तर; भारतीय दूतावासाबाहेर निदर्शनं सुरू होताच…
Air India passengers create ruckus after got stranded in Mumbai-Dubai flight
Air Indiaच्या विमानात ५ तास अडकून पडले प्रवासी, खाली उतरवण्यासाठी घातला गोंधळ; व्हायरल होतोय Video
Mohammed Siraj Zanai Bhosle Affair Asha Bhosle Granddaughter Breaks Silence on Relationship Rumours with Instagram Story
Mohammed Siraj Zanai Bhosle: मोहम्मद सिराज व आशा भोसलेंची नात खरंच एकमेकांना डेट करतायत? जनाईने फोटो पोस्ट करत केला खुलासा
Amit Shah maha kumbh ANI
Maharashtra Breaking News Updates : महाकुंभ : अमित शाहांचं त्रिवेणी संगमावर शाही स्नान
पॅराक्वॅट विषबाधा म्हणजे काय? ग्रीष्माने तिच्या प्रियकराची हत्या कशी केली? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Paraquat Poisoning : पॅराक्वॅट म्हणजे नेमकं काय? त्यामुळे विषबाधा कशी होते?
Minor boy arrested for killing infant G
१५ वर्षांचा प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चार महिन्यांचे बाळ आणि माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा…

त्यानंतर बँडचा प्रमुख गायक ख्रिस मार्टिन याने बुमराहसाठी एक खास गाणे गायले, ज्यामध्ये त्याने बुमराहच्या गोलंदाजीचं कौतुक केलं म्हणाला की, जेव्हा तो इंग्लंडची विकेट घेतो तेव्हा त्याला मजा येत नाही पण बुमराह जगातील बेस्ट गोलंदाज असल्याचे त्याने म्हटले. यानंतर लगेचच एक व्हिडिओही सुरू झाला ज्यामध्ये बुमराह इंग्लंडच्या फलंदाजांचे स्टंप उडवत होता. यानंतर स्टेडियममध्ये एकच बुमराह-बुमराहचे नारे लागले आणि भारतीय स्टार वेगवान गोलंदाजालाही हसू आवरलं नाही.

ख्रिस मार्टिनने बुमराहसाठी खास गाणं गायलं ज्यामध्ये तो बोलताना दिसला की, “Jasprit, my beautiful brother. The best bowler in the whole of cricket. We do not enjoy, watching you destroy… England with wicket after wicket after wicket,” दरम्यान जसप्रीत बुमराह गाणं ऐकून हसताना दिसला.

कोल्डप्ले बँडने फक्त हैदराबादमध्ये नव्हे तर त्यांनी त्यांच्या भारतातील वेगवेगळ्या कॉन्सर्टसमध्ये बुमराहच्या कामगिरीचं कौतुक केलं. गेल्या आठवड्यात मुंबईतील एका कॉन्सर्टमध्ये गायकाने बुमराहचा उल्लेख केला होता. डी. वाय पाटील स्टेडियममधील कॉन्सर्टमध्ये ख्रिस मार्टिन म्हणाला होता की, “बुमराह बॅकस्टेजला आला आहे आणि आता कॉन्सर्ट १५ मिनिटं थांबवावं लागेल कारण बुमराहला माझ्याविरूद्ध गोलंदाजी करायची आहे. दरम्यान, बुमराहने यावेळी आपली प्रतिक्रिया दिली. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिले की, यामुळे माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं! मुंबईतील कोल्डप्ले कॉन्सर्टमधील अविश्वसनीय वातावरण आणि त्याहूनही विशेष की माझा उल्लेख केला गेला.”

Story img Loader