भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा त्याच्या पाठीच्या दुखण्यामुळे आगामी टी२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. या अशा स्वरूपाच्या बातम्या अनेक वृत्तसंस्थांमधून बाहेर आल्या होत्या. तशा प्रकारची अधिकृत माहिती देखील बीसीसीआयने ट्विटर ट्विट करून दिली होती. संघातील महत्त्वाचा खेळाडू जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे बाहेर पडला असून तो आता ऑस्ट्रेलियाला जाऊ शकत नाही.

बुमराहच्या दुखापतीबद्दल सर्व ठिकाणी बातम्या येत होत्या. काल शुक्रवारी बीसीसीआयने आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन सामन्यांसाठी बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजची निवड केली. ही घोषणा करताना देखील त्यांनी बुमराहच्या दुखापतीबद्दल काही सांगितले नाही. आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीच याबद्दल स्पष्टपणे सांगितले.

हेही वाचा   :  Jasprit Bumrah: पाकिस्तानचा माजी खेळाडू म्हणतो की, जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा फेरारी कार आहे 

विश्वचषक सहभागाविषयी साशंकता आहे  बुमराह विश्वचषकातून बाहेर होणार या चर्चेला ऊत आला असताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष  सौरव गांगुली यांनी बुमराह अजूनही विश्वचषकातून बाहेर झाला नसल्याचे वक्तव्य केले आहे. सौरव गांगुली यांना नुकताच एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत जसप्रीत बुमराहच्या दुखापतीविषयी विचारले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “बुमराह अद्याप विश्वचषकातून बाहेर गेला नाही. विश्वचषक सुरू होण्यासाठी आणखी काही दिवस अवधी आहे. आपण काही काळ थांबावे. घाईत काहीतरी वक्तव्य करणे चुकीचे ठरेल.”

जसप्रीत बुमराह याची दुखापत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. यातून पूर्णपणे सावरण्यासाठी त्याला चार ते सहा महिने लागतील असे बोलले जातेय. मात्र, बुमराह अद्याप विश्वचषकामधून बाहेर झालेला नाही. गांगुली यांनी भलेही बुमराहच्या बाजूने आणि चाहत्यांना दिलासा देणारे वक्तव्य केले असले तरी, बोलताना त्यांनी अद्याप हा शब्द वापरला आहे. त्यामुळे नक्की काय होईल आत्ताच सांगणे अनुचित ठरेल.

भारतीय संघचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ही बुमराह संदर्भात एक वक्तव्य केले आहे. तो असं म्हणतो की, “बुमराहच्या बाबतीत आलेल्या वैद्यकीय अहवालासंदर्भात मी फार खोलवर जाणार नाही. या संदर्भात तज्ञांनीच भाष्य केलेले योग्य ठरेल. पुढील काही दिवसात आपल्याला नक्की काय ते कळेल. जोपर्यंत अधिकृतपणे मला सांगितले जात नाही तोपर्यंत मी बुमराहला विश्वचषकामधून बाहेर काढल्याचे मी सांगणार नाही.” याचा अर्थ पुढे भविष्यात काहीही होऊ शकते.

Story img Loader