Jasprit Bumrah Breaking News: भारतीय क्रिकेट संघाला टी२० विश्वचषका आधी खूप मोठा झटका बसला आहे. संघातील प्रमुख जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. आगामी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ तयारी करत आहे. सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात टी२० मालिका खेळत आहे. जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती ही टीम इंडियाला परवडवणारी नाही. कारण बुमराह गोलंदाजी करतो, त्यावेळी त्याची दिशा, टप्पा आणि यॉर्करला तोड नाहीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आता जसप्रीत बुमराहच्या जागी संघ व्यवस्थापनला नवीन पर्याय शोधावा लागणार आहे. सध्यातरी जसप्रीत बुमराहची जागा घेऊ शकतील अशी दोन नाव आहेत. त्या दोघांचा विश्वचषकासाठी निवडलेल्या संघामध्ये थेट समावेश करण्यात आला नव्हता. दोघांनाही स्टँडबायवर ठेवलं होतं. आता मात्र त्या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. मोहम्मद शमी आणि दीपक चाहर बुमराहची जागा घेऊ शकतील असे हे दोन खेळाडू आहेत. मोहम्मद शमीकडे जसप्रीत बुमराह इतकाच अनुभव आहे. दीपक चाहरकडे स्विंगची कला आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये चेंडू नवा असताना कशा विकेट काढायच्या? त्यात दीपक चाहर माहीर आहे. काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात हे दिसूनही आलं.

हेही वाचा : Jasprit Bumrah: ब्रेकिंग! आगामी टी२० विश्वचषकातून जसप्रीत बुमराह बाहेर, रोहित सेनेला मोठा धक्का  

तिसरा पर्याय म्हणजे शार्दूल ठाकूर असून तो अष्टपैलूची भूमिका बजावू शकतो. तसेच त्याने भारत अ संघाकडून खेळताना अतिशय चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरपर्यंत संघातील बदल करून त्याचे नाव पाठवू शकतो. लॉर्ड ठाकूरने नेहमीच संघ अडचणीत असताना ब्रेक-थ्रू मिळवून दिले आहेत. त्यामुळे त्याचा पर्याय हा निश्चितच उत्तम असू शकतो. मोहम्मद सिराज देखील इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे. त्याने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याचा देखील विचार होऊ शकतो. आता निवड समिती कोणावर विश्वास दाखवते, ते लवकरच स्पष्ट होईल.