World Cup 2023, India vs Australia Match Upadates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील पाचवा सामना रविवारी (८ ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर टीम इंडियाने शानदार कामगिरी केली. या सामन्यात भारतीय गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये दिसले. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का देत कांगारू संघाला बॅकफूटवर आणले.

जसप्रीत बुमराहने रचला इतिहास –

बुमराहने विरोधी संघाचा सलामीवीर मिचेल मार्शला आपला बळी बनवले. मार्शला शून्यावर बाद करत जसप्रीत बुमराहाने टीम इंडियासाठी इतिहास रचला.२९ वर्षीय बुमराह वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियन सलामीवीराला शून्यावर बाद करणारा टीम इंडियाचा पहिला गोलंदाज ठरला आहे. बुमराहपूर्वी विश्वचषकात ऑस्ट्रेलियन सलामीवीराला शून्यावर बाद करण्याचा पराक्रम कोणत्याही भारतीय गोलंदाजाला करता आला नव्हता. भारताविरुद्ध मिचेल मार्शची बॅट पूर्णपणे नि:शब्द झाली आहे. कांगारू संघाच्या डावाची सुरुवात करताना त्याने एकूण सहा चेंडूंचा सामना केला. दरम्यान, खाते न उघडता मार्श बुमराहचा बळी ठरला. विराट कोहलीने मार्शचा अप्रतिम झेल घेतला.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
ojas kulkarni of kolhapur participated in first world cup kho kh
ऑस्ट्रेलियन खो-खोची ‘ओजस्वी’ कहाणी! खेळ माहीत नसलेल्या देशाचा भारतीय ‘द्रोणाचार्य’
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
14-year old Ira Jadhav slams 346 in U19 cricket breaks Smriti Mandhanas record against Meghalaya
Ira Jadhav : १५७ चेंडू, ३४६ धावा आणि ४२ चौकार…इरा जाधवने स्मृती मानधनाला मागे टाकत झळकावले विक्रमी त्रिशतक
NZ vs SL Sri Lanka beat New Zealand by 140 runs Mark Chapman 82 runs in 3rd ODI match at Eden Park
NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा १५० वा सामना –

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा १५० वा एकदिवसीय सामना आहे. कोणत्याही एका संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची ही भारताची दुसरी सर्वाधिक सामने आहेत. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारताने श्रीलंकेविरुद्ध १६७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर तर वेस्ट इंडिजचा संघ १४२ वनडेसह तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IND vs AUS, World Cup 2023: डेव्हिड वॉर्नरने विश्वचषकात रचला इतिहास, सचिन-डिव्हिलियर्सला मागे टाकत केला ‘हा’ खास पराक्रम

कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध भारताने खेळलेले सर्वाधिक एकदिवसीय सामने:

१६७ सामना: विरुद्ध श्रीलंका
१५० सामने: विरुद्ध ऑस्ट्रेलिया*
१४२ सामना: विरुद्ध वेस्ट इंडिज
१३४ सामना: विरुद्ध पाकिस्तान
११६ सामना: विरुद्ध न्यूझीलंड
१०६ सामना: विरुद्ध इंग्लंड

एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा –

डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो चौथा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. त्याच्या आधी रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट आणि मार्क वॉ यांनी ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा – IND vs AUS, World Cup 2023: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात गोंधळ घालणारा ‘जार्व्हो ६९’ आहे तरी कोण? जाणून घ्या

एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या सर्वाधिक धावा –

१७४३ धावा: रिकी पाँटिंग
१०८५ धावा: अॅडम गिलख्रिस्ट
१०३३ धावा: डेव्हिड वॉर्नर<br>१००४ धावा: मार्क वॉ
९८७ धावा: मॅथ्यू हेडन

Story img Loader