Jasprit Bumrah Record IND vs AUS 2nd Test: भारत-ऑस्ट्रेलिया गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने ८६ धावा केल्या असून १ विकेट गमावली आहे. यासह पहिल्या डावात १८० धावा केलेला भारतीय संघ अजूनही ९४ धावा पुढे आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली आहे. बुमराहने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाला बाद करत एक मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जसप्रीत बुमराह २०२४ मध्ये ही कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

जसप्रीत बुमराहने २०२४ सालामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने फिरवून भारताला विजय मिळवून दिला. पण यादरम्यानच बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत या वर्षात आपले ५० कसोटी विकेट पूर्ण केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये ५० विकेट पूर्ण करणारा तो पहिला गोलंदाज आहे. बुमराहने भारत ऑस्ट्रेलिया मध्ये सुरू असलेल्या ॲडलेट कसोटीत उस्मान ख्वाजाला बाद करत ५० विकेटचा टप्पा गाठला आहे.

हेही वाचा – Nitish Reddy: “मी वडिलांना रडताना पाहिलं अन्…”, नितीश रेड्डीने सांगितला जीवनातील टर्निंग पॉईंट; विराटबाबत पाहा काय म्हणाला?

२२ वर्षांनंतर भारतीय गोलंदाजाने केली ही उत्कृष्ट कामगिरी

भारतीय संघाच्या फारच कमी वेगवान गोलंदाजांनी एका वर्षात ५० विकेट्सचा टप्पा गाठला आहे. एका वर्षात ५० विकेट पूर्ण करणारा बुमराह हा तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी ही कामगिरी फक्त कपिल देव आणि जहीर खान हे दोन वेगवान गोलंदाज करू शकले. जसप्रीत बुमराच्या आधी २०२ मध्ये जहीर खानने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ विकेट एका वर्षात मिळवले होते. म्हणजेच तब्बल २२ वर्षानंतर एखाद्या भारतीय गोलंदाजाने ५० विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. १९७९ मध्ये पहिल्यांदा कपिल देव यांनी एका वर्षात ५० अधिक विकेट घेण्याची कामगिरी केली होती. त्यांनी एका वर्षात ७४ विकेट मिळवले होते. हे वर्ष संपण्याआधी भारताचे दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे या सामन्यांमध्ये बुमराह किती विकेट्स मिळवतो यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

हेही वाचा – IND U19 vs SL U19: भारताचा U19 संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत, १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीने २४ चेंडूत केलं अर्धशतक; अंतिम फेरीत कोणाविरूद्ध खेळणार?

u

एका कॅलेंडर वर्षात भारताला सर्वाधिक कसोटी विकेट मिळवून देणारे भारतीय वेगवान गोलंदाज

कपिल देव – ७५ विकेट (१९८३)
कपिल देव – ७४ विकेट (१९७९)
झहीर खान – ५१ विकेट (२००२)
जसप्रीत बुमराह – ५० विकेट (२०२४)
जसप्रीत बुमराह – ४८ विकेट (२०१८)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrah becomes first bowler to pick 50 test wickets in 2024 joins kapil dev zaheer khan in elite list ind vs aus