जसप्रीत बुमराहने गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून आपलं स्थान पक्क केलं आहे. त्याच्या अनोख्या शैलीमुळे भलेभले फलंदाज हे बुचकळ्यात पडतात. याचसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराह ज्या पद्धतीने यॉर्कर चेंडू टाकतो त्याला तोड नाही, असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. मात्र त्याची हीच शैली भविष्यकाळात त्याला धोकादायक ठरू शकते. बुमराहला पाठीचा विकार जडू शकतो असं मत व्यक्त केलं आहे, प्रसिद्ध डॉक्टर सायमन फेरोस यांनी. डॉ. फेरोस हे सध्या प्रसिद्ध फिजीओथेरपिस्ट जॉन ग्लोस्टर यांच्यासोबत ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियामध्ये डिकीन विद्यापीठात कार्यरत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in