Jasprit Bumarh 400 Wickets in International Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वाचा आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चेन्नई येथे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा गाठला. बुमराहने पहिल्या डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० विकेट पूर्ण केले आणि अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. बुमराहने हरभजन सिंगला मागे टाकलं आहे.
Jasprit Bumrah: बुमराह दिग्गज गोलंदाजांच्या यादीत
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात ९ धावा करत खेळत असलेल्या हसन महमूदला विराट कोहलीकरवी झेलबाद करताच बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४०० विकेट्स पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा बुमराह सहावा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. कपिल देव, झहीर खान, जवागल श्रीनाथ, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा हे भारतीय गोलंदाज आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० किंवा त्याहून अधिक विकेट घेतले आहेत. आता या महान खेळाडूंच्या यादीत बुमराहही सामील झाला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज
६८७ – कपिल देव
६१० – झहीर खान
५५१ – जवागल श्रीनाथ
४४८ – मोहम्मद शमी
४३४ – इशांत शर्मा
४०० – जसप्रीत बुमराह</p>
हेही वाचा – IND vs BAN: हसन महमूदने भारताविरूद्ध कसोटीत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला बांगलादेशचा पहिला गोलंदाज
बुमराहने हरभजनचा विक्रम मोडला
बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२७ डावात ४०० विकेट घेतले आहेत तर भज्जीने २३७ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात ४०० विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत बुमराह पाचव्या क्रमांकावर आहे तर भज्जी आता सहाव्या स्थानावर घसरला आहे. या बाबतीत अश्विन पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने २१६ डावात ४०० विकेट्स घेतल्या आहेत.
भारतासाठी सर्वात कमी डावात ४०० आंतरराष्ट्रीय विकेट घेणारे गोलंदाज
२१६ – रविचंद्रन अश्विन
२२० – कपिल देव
२२४ – मोहम्मद शमी
२२६ – अनिल कुंबळे
२२७ – जसप्रीत बुमराह
२३७ – हरभजन सिंग