Jasprit Bumrah breaks Arshdeep Singh’s record: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ३२७ दिवसांनंतर मैदानानवर पुनरागमन केले. आयर्लंडविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळताना त्याने दमदार कमबॅक केले. एवढ्या कालावधीनंतर मैदानात उतरलेल्या बुमराहने पहिल्याच सामन्यात कर्णधार म्हणून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. बुमराहने आपल्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीराचा किताबही मिळवला. त्याचबरोबर या सामन्यात अर्शदीप सिंगला मागे टाकत आर अश्विनच्या या विशेष विक्रमाशी बरोबरी साधली.
बुमराह अश्विन, भुवी आणि हार्दिकच्या खास लिस्टमध्ये झाला सामील –
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात दोन विकेट घेणारा बुमराह भारताचा चौथा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी हा पराक्रम आर अश्विनने २०१६ मध्ये, भुवनेश्वर कुमारने २०२२ मध्ये, हार्दिक पांड्याने २०२३ मध्ये केला होता.
टी-२० मध्ये भारतासाठी पहिल्या षटकात दोन विकेट घेणारे गोलंदाज –
आर अश्विन विरुद्ध श्रीलंका – विझाग (२०१६)
भुवनेश्वर कुमार विरुद्ध अफगाणिस्तान – दुबई (२०२२)
हार्दिक पांड्या विरुद्ध वेस्ट इंडिज – प्रॉव्हिडन्स (२०२३)
जसप्रीत बुमराह विरुद्ध आयर्लंड – मालाहाइड (२०२३)
जसप्रीत बुमराहने अश्विनच्या विक्रमाशी केली बरोबरी –
बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ४ षटकात २४ धावा देऊन २ विकेट घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर आता त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७२ विकेट्स झाल्या आहेत. त्याने आर अश्विनची बरोबरी केली, ज्याने या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत भारतासाठी एकूण ७२ बळी घेतले आहेत. भारताकडून टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज युजवेंद्र चहल आहे, ज्याच्या नावावर ९६ विकेट्सची नोंद आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
९६ – युजवेंद्र चहल
९० – भुवनेश्वर कुमार<br>७३ – हार्दिक पंड्या
७२ – रविचंद्रन अश्विन<br>७२- जसप्रीत बुमराह</p>
जसप्रीत बुमराहने मोडला अर्शदीप सिंगचा विक्रम –
बुमराहने टी-२० मध्ये भारतासाठी पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करताना २३ विकेट्स घेत अर्शदीप सिंगला मागे टाकले आहे, ज्याच्या नावावर २१ विकेट आहेत. आता बुमराह टी-२० क्रिकेटच्या पॉवरप्लेमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ४७ विकेट्स घेतल्या आहेत.