Jasprit Bumrah Frustrated Video Viral: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी स्विंग नसल्याची तक्रार करताना दिसला. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ बराच काळ वाट पाहिल्यानंतर रद्द करण्यात आला. उभय संघांमधील गाबा कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ १३.२ षटकांचाच खेळ होऊ शकला. मात्र, गाबाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना फारशी अनुकूल नसल्याने बुमराह अस्वस्थ दिसत होता, या सामन्यातील बुमराहचा व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माने गाबा कसोटीची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हवामानाचा अंदाज पाहता गोलंदाजांना मदत मिळेल या हिशोबाने रोहितने हा निर्णय घेतला. पण प्रत्यक्षात सामना सुरू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चांगली फलंदाजी करताना दिसले. सामन्यादरम्यान बुमराह पाचव्या षटकात चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न करत होता, पण खेळपट्टी फारशी मदत करत नसल्याचे त्याच्या लक्षात आले.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्मावर गाबा कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतल्यामुळे का होतेय टीका?

बुमराहचा सामन्याच्या पाचव्या षटकातील एक व्हीडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये स्टंप माईकमध्ये त्याचा बोलतानाचा आवाजही रेकॉर्ड झाला आहे. पाचव्या षटकातील पहिला चेंडू टाकल्यानंतर बुमराह गिलबरोबर बोलताना म्हणाला, चेंडू खूप वर आहे. यानंतर पाचव्या चेंडूवर बुमराह म्हणाला, असंही चेंडू स्विंग होत नाहीय, कुठेही टाकू शकतो. ढगाळ वातावरणात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण वेगवान गोलंदाजांना मदत मिळाल्याने बुमराह वैतागलेला दिसला.

हेही वाचा – IND vs AUS: गाबा कसोटीच्या अखेरच्या ४ दिवसांची पावसामुळे वेळ बदलली, सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

पावसाची शक्यता असल्याने तिसरा कसोटी सामना ढगाळ वातावरणात सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजी करण्यासाठी उतरलेले भारतीय वेगवान गोलंदाज लय शोधण्यासाठी धडपडताना दिसले आणि त्यांना विकेट घेता आली नाही. मात्र, भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्विनी यांना जास्त धावा करण्याची फारशी संधी दिली नाही. आकाशदीपने योग्य लाईन आणि लेंग्थसह गोलंदाजी करताना फलंदाजांना त्रास दिला.

हेही वाचा – VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रमप्रीमियम स्टोरी

सततच्या पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ थांबला. दिवसाचा खेळ रद्द करेपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद २८ धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजा नाबाद १९ धावा आणि नॅथन मॅकस्विनी ४ धावांवर नाबाद आहेत. पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात लंच ब्रेकपूर्वी काही वेळ शिल्लक होता, पण लंच ब्रेकपूर्वी पुन्हा पाऊस सुरू झाला आणि सामना थांबवावा लागला. पाऊस जोरदार आल्याने निश्चित वेळेआधी लंच ब्रेक घेण्यात आला.

हेही वाचा – Gus Atkinson: इंग्लंडच्या गस ॲटकिन्सचा मोठा पराक्रम, कसोटीच्या १४७ वर्षांच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा फक्त दुसरा गोलंदाज

दुसऱ्या सत्राचा खेळ पावसामुळे सुरू झाला आणि हवामानाचा अंदाज पाहता पंचांनी दिवसाचा खेळ पद्द केला. पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे आता दुसऱ्या दिवशी ९८ षटकांचा सामना खेळवण्यात येणार आहे आणि सामना नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी सुरू होईल. म्हणजेच दुसऱ्या दिवसाचा सामना भारतीय वेळेनुसार पहाटे ५:२० वाजता सुरू होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrah frustrate over ball not swinging in ind vs aus gabba test stump mic video goes viral bdg