India vs Ireland 1st T20, Jasprit Bumrah: तब्बल दीड वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी करत आपण पुन्हा त्याच जोमाने आलो आहोत हे दाखवून दिले. पहिल्याच षटकात यजमानांच्या दोन मोठ्या विकेट्स घेत त्याने टीम इंडियाला सामन्यात खूप पुढे नेले. कोणत्याही वेगवान गोलंदाजासाठी, जवळपास ११ महिने संघाबाहेर राहिल्यानंतर पुनरागमन करणे हे बुमराहने केले तितके सोपे नाही. त्याने आपल्या यशाचे श्रेय संघातील फिजिओ, सहकारी खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना दिले, ज्यांनी त्याला नेहमी चांगल्या मूडमध्ये ठेवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माहितीसाठी की, टीम इंडियाने डकवर्थ लुईसच्या (DLS) मदतीने पावसाने खोडा घातलेल्या पहिल्या टी२० सामन्यात २ धावांनी रोमहर्षक विजय मिळवत या तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. कर्णधार बुमराह भारताच्या विजयाचा हिरो ठरला आणि त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपद आणि पदार्पण करताना सामनावीर पुरस्कार जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

हेही वाचा: Shikhar Dhawan: “शिखर धवनला न्याय… आशिया कपपूर्वी माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य

माझं संघात पुन्हा येण्याचं स्वप्न साकार झालं- जसप्रीत बुमराह

सामन्यानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला, “खूप छान वाटले, मी एनसीएमध्ये अनेक सरावसत्रे खेळलो, असे वाटले नाही की मी खूप गमावले आहे किंवा काहीतरी नवीन करत आहे. याचे सारे श्रेय कर्मचाऱ्यांना जाते, त्यांनी मला चांगल्या मूडमध्ये ठेवले. माझं संघात पुन्हा येण्याचं स्वप्न साकार झालं. तुम्ही स्वतःचा विचार करत नसून तुम्ही इतरांचा विचार करत आहात, हे यातून दिसते. आज डोक्यावरील ताण कमी झाला असून खूप आनंदी वाटत आहे. सुरुवातीला चेंडू खेळपट्टीवर स्विंग होत होता त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा करून घ्यायचा होता. सुदैवाने आम्ही नाणेफेक जिंकली आणि सर्व ठरवल्याप्रमाणे होत गेले. हवामानामुळे थोडी मदत झाली, त्यामुळे चेंडू अधिकच स्विंग झाला याचा मला खूप आनंद झाला.”

बुमराह पुढे म्हणाला की, “प्रत्येक गेममध्ये तुम्हाला अधिक हवे असते. खराब सुरुवातीनंतर चांगले खेळले, त्याचे श्रेय घ्या. तुम्ही जिंकल्यावरही, सुधारण्यासाठी अनेक जागा आहेत. प्रत्येक खेळाडू हा खूप आत्मविश्वासाने भरलेला आहे. त्यामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण हे खूप चांगले आहे. मला वाटते की, आयपीएलमुळे हे युवा खेळाडू आज भारतीय संघात खेळत आहेत आणि याची त्यांना मदतच झाली. आम्ही जेथे जातो तेथे चाहते आम्हाला समर्थन करतात, ज्यामुळे आमचे मनोबल उंचावण्यास मदत होते.”

हेही वाचा: India vs Ireland 1st T20: डकवर्थ लुईस नियमानुसार टीम इंडियाने मारली बाजी, आयर्लंडचा दोन धावांनी उडवला धुव्वा

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघाने २० षटकांत ७ गडी गमावून १३९ धावा केल्या. कर्णधार बुमराहशिवाय प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांना २-२ विकेट्स घेण्यात यश मिळाले, तर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनेही एक विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४६ धावा जोडत टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली. यशस्वी ७व्या षटकात २४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला, तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला तिलक वर्मा पुढच्याच चेंडूवर गोल्डन डकवर बाद झाला. पावसामुळे खेळ थांबेपर्यंत टीम इंडियाने 6.5 षटकात ४७ धावा ठोकल्या होत्या आणि सामना २ धावांनी जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrah gave him the credit of his dream comeback won this special award as soon as he arrived avw