Jasprit Bumrah Press Conference IND vs AUS 3rd Test: गाबा कसोटीत तिसऱ्या दिवशी पावसाने खूपच व्यत्यय आणला परिणामी दिवसाचा खेळ लवकर संपवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावांचा डोंगर उभारला आहे. तर प्रत्युत्तरात फलंदाजी करताना भारतीय संघाने १७ षटकांत ५१ धावा करत ४ विकेट्स गमावले आहेत. भारताच्या फलंदाजीदरम्यान बऱ्याच वेळेस पावसाने खेळ थांबवावा लागला. पण गाबा कसोटीत जसप्रीत बुमराहने सर्वांनाच प्रभावित केले आहे. बुमराहने ६ विकेट्स घेत चांगली कामगिरी केली. यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जसप्रीत बुमराहने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तर दिली.

भारतीय संघाला ४४५ धावांचा टप्पा गाठून चांगली धावसंख्या उभारायची आहे पण ५० धावांच्या आतच भारताची टॉप ऑर्डर कोसळली. त्यामुळे गाबा कसोटी फलंदाजीबाबत पत्रकारांनी बुमराहला प्रश्न विचारला त्यावर बुमराहने गमतीत उत्तर दिलं.

हेही वाचा – WTC Final Scenario: गाबा कसोटी गमावल्यानंतर भारत WTC 2025 फायनलच्या शर्यतीतून होणार बाहेर?

एका पत्रकाराने बुमराहला तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातील भारताच्या फलंदाजीच्या कामगिरीबद्दल त्याचे विचार विचारले. फलंदाजीवर भाष्य करण्यासाठी बुमराह हा आदर्श व्यक्ती नसू शकतो हे मान्य असल्याचे म्हणत पत्रकाराने म्हणथ उपकर्णधार म्हणून त्याचं मत काय आहे, असा प्रश्न त्याने विचारलं. यावर बुमराहने त्याला गुगलवर त्याचा फलंदाजी रेकॉर्ड तपासण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा – NZ vs ENG: केन विल्यमसनने शतकासह घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज

पत्रकारचा प्रश्न – “हॅलो, जसप्रीत. फलंदाजीबाबत तुझं काय म्हणणं आहे, या प्रश्नाचे उत्तर देणारा तू सर्वोत्तम व्यक्ती नसलास तरी गाबामधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता संघाच्या स्थितीबद्दल तुला काय वाटते?”

बुमराहचं उत्तर – “हा मजेदार प्रश्न आहे. पण, तुम्ही माझ्या फलंदाजीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. तू एक काम कर गुगलवर सर्च कर की कसोचीच्या एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे. हा विनोदाचा भाग. ही एक वेगळी गोष्ट आहे.”

हेही वाचा – Jason Gillespie on PCB: “हाच तो क्षण जेव्हा वाटलं…”, पाकिस्तान बोर्डाची जेसन गिलेस्पी यांनी केली पोलखोल, राजीनामा देण्यामागचे सांगितले कारण

बुमराहच्या प्रतिक्रियेने पत्रकारांचा एकच हशा पिकला. भारताचा उपकर्णधार असलेल्या बुमराहने २०२२ मध्ये इंग्लंडविरूद्ध बर्मिंगहॅम कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडविरुद्धच्या एका षटकात बुमराहने ३४ धावा केल्या होत्या, याचा संदर्भ बुमराहने दिला. यादरम्यान एका कसोटी सामन्यात इंग्लंडच्या अनुभवी वेगवान गोलंदाजाला तीन चौकार आणि ३ षटकार लगावले होते.

Story img Loader