आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारताने बांगलादेशचा ३ गडी राखून पराभव केला आणि सातव्यांदा स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं. २२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. पण मधल्या षटकांमध्ये डाव काहीसा गडबडला. त्यातच मोक्याच्या क्षणी केदार जाधव दुखापतीने ग्रस्त झाला पण अखेर त्याने भारताला सामना जिंकवून दिला. या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने बांगलादेशला २२२ धावांमध्ये गुंडाळले होते. यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याचे मोलाचे योगदान होते.

इंग्लंड येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बुमराहने टाकलेल्या नो बॉलमुळे भारताचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर जयपूर पोलिसांनी शहरात पोस्टर लावून त्यावर बुमराह नो बॉल फेकत असल्याचे दाखवले होते. त्या पोस्टरवर ‘काही रेषा ओलांडणे हे महागात पडू शकते’, असा संदेश देत बुमराहची खिल्ली उडवण्यात आली होती.

 

शुक्रवारी मात्र बुमराह अचूक मारा करत बांग्लादेशच्या गोलंदाजांना रोखून धरले. परिणामी भारताला तो सामना ३ गडी राखून जिंकता आला. त्यानंतर बुमराहने आशिया चषक हाती घेऊन एक फोटो काढला. तो फोटो ट्विट करून त्याने त्या खाली संदेश लिहिला. ‘ काही लोक अतिशय कल्पक बुद्धी वापरून छान असे फलक तयार करतात. मला अशी आशा आहे की आता या ट्रॉफीसह मी काढलेला फोटोचा देखील ते लोक फलक लावतील.

दरम्यान, या ट्विटनंतर या पोस्टवर प्रतिक्रियांचा वर्षाव झाला.

Story img Loader