Jasprit Bumrah unfollows Mumbai Indians : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. पंड्या गुजरात टायटन्सचा कर्णधार होता, पण तो आता आगामी हंगामात मुंबई इंडियन्ससाठी खेळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत आता शुबमन गिलला गुजरातचा कर्णधार नियुक्त केले आहे. या सगळ्यात आता मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर मुंबई इंडियन्सला अनफॉलो केले आहे. यामुळे क्रिकेट विश्वात चर्चांना उधान आले आहे. चाहते सर्व प्रकारचे अनुमान लावत आहेत, चाहत्यांना असे वाटते की बुमराह आणि मुंबई इंडियन्समध्ये सर्व काही ठीक नाही.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या इन्स्टा स्टोरीद्वारे खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या स्टोरीनंतर सोशल मीडियावर सर्व प्रकारच्या अटकळांना सुरुवात झाली आहे. वास्तविक, बुमराहने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एका पोस्टद्वारे लिहिले आहे की, कधीकधी शांत राहणे हे देखील चांगले उत्तर असते. बूम-बूमच्या या स्टोरीने चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. कारण ही स्टोरी कोणासाठी आहे किंवा तो कोणावर नाराज आहे, हे स्पष्ट झाले नाही.
जसप्रीत बुमराहने इन्स्टावर शेअर केली स्टोरी –
जसप्रीत बुमराहने ट्विटर आणि इन्स्टाग्राम या दोन्ही सोशल मीडिया हँडलवरून बुमराहला अनफॉलो केले आहे. बुमराहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये ‘सायलेन्स इज समटाइम्स द बेस्ट आन्सर’ असे लिहिले आहे. याचा अर्थ असा की कधीकधी एखाद्या प्रश्नाचे सर्वोत्तम उत्तर म्हणजे शांत राहणे. यावरून बुमराहच्या मनात बरेच काही सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुमराह जबरदस्तीने गप्प राहण्याचा प्रयत्न करत आहे. हार्दिक पंड्याचे मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन झाल्यामुळे बुमराह खूश नसल्याचा अंदाज सोशल मीडियावर लावला जात आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केले आहे.
हेही वाचा – T20 World Cup 2024 : ‘मी भारताला लवकरच…’, टीम इंडियाबद्दल रवी शास्त्रींचे मोठं वक्तव्य
बुमराह मुंबई इंडियन्सला सोडणार का?
जसप्रीत बुमराहच्या या इन्स्टा स्टोरीने अटकळांचा बाजार चांगलाच तापवला आहे आणि सर्वात चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे बुमराह मुंबई इंडियन्सवर नाराज आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्याने बुमराह नाराज आहे आणि आता तो फ्रेंचायझी सोडू शकतो. बुमराहने इन्स्टा आणि ट्विटरवरून मुंबई इंडियन्सला अनफॉलो केल्यामुळेही हे अटकळ बांधले जात आहेत. तसेच त्याने एमएस धोनीला फॉलो करायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा – IPL 2024 : अखेर गुजरात टायटन्सनं सांगितलं हार्दिक पंड्याला सोडण्याचं कारण; विक्रम सोलंकी म्हणाले…
बुमराहच्या स्टोरीतून मिळतात अनेक संकेत –
बुमराहने आणखी एक स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘एखाद्या गोष्टीबद्दल लोभी असणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु एकनिष्ठ असणे ही चांगली गोष्ट नाही.’ बुमराहची ही पोस्ट बरेच काही सांगून जाते. मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही निर्णयावर बुमराह खूश नाही. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स सोडू शकतो, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. बुमराहचे मुंबईला अनफॉलो करणे, हे स्पष्टपणे सूचित करते की बुमराह एमआयवर खूश नाही आणि तो कधीही मुंबईला अलविदा करू शकतो.