Jasprit Bumrah Practice Team India: यावर्षी ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. दुखापतीमुळे बराच काळ बाहेर असलेला जसप्रीत बुमराह लवकरच ‘मेन इन ब्लू’ मध्ये मैदानात दिसणार आहे. पाठीवरील शस्त्रक्रियेनंतर २९ वर्षीय बुमराह सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. तो हळूहळू त्याच्या सरावाचा वेग वाढवत असून पुन्हा फिटनेस मिळविण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे. यासोबतच संघाबाहेर असणारा आणखी एक महत्त्वाचा फलंदाज श्रेयस अय्यरनेही शस्त्रक्रियेनंतर पुन्हा फलंदाजीला सुरुवात केली आहे. सर्व काही ठीक राहिल्यास, पुढील महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर होणाऱ्या टी२० मालिकेत दोन्ही खेळाडू टीम इंडियाचा भाग असतील!

बुमराह दिसणार आयर्लंड दौऱ्यावर!

Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे
Travis Head Fastest Century in Day Night Test Match IND vs AUS Adelaide Test
Travis Head: ट्रॅव्हिस हेडचे डे-नाईट कसोटीत सर्वात जलद शतक, स्वत:चा रेकॉर्ड मोडत केली मोठी कामगिरी; भारत बॅकफूटवर
Kagiso Rabada Bat Broke in t20 parts on Lahiru Kumara Ball in SA vs SL 2nd Test Watch Video
SA vs SL: चेंडूच्या वेगासमोर बॅटचे झाले दोन तुकडे, थोडक्यात वाचला कगिसो रबाडाचा हात; VIDEO होतोय व्हायरल
Mohammed Siraj Bowled World Fastest Ball Highest Speed of 181 6 kmph Know The Truth IND vs AUS
Mohammed Siraj Fastest Ball: 181.6 kmph… मोहम्मद सिराजने टाकला क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू? स्क्रिनवर दाखवण्यात आलेल्या वेगाचं काय आहे सत्य

जसप्रीत बुमराह बीसीसीआय क्रिकेट प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या देखरेखीखाली सराव करत असून लवकरच तो टीम इंडियात पुनरागमन करेल. नेटमध्ये तो गेल्या काही दिवसांपासून ८-१० षटके गोलंदाजी करत आहे, असे इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे. आतील माहिती अशी आहे की, निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन सप्टेंबरमध्ये आशिया चषकासाठी बुमराहचा समावेश करण्याचा विचार करत आहेत. गेल्या काही आठवड्यात त्याने दाखवलेला फिटनेस पाहता तो कमी अनुभवी भारतीय संघासह पुढील महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर जाऊ शकतो. येत्या काही दिवसांत यावर निर्णय होईल, असे मानले जात आहे.

हेही वाचा: Team India: द्रविडला विश्रांती! व्हीव्हीएस लक्ष्मण होणार टीम इंडियाचे प्रशिक्षक, आयर्लंड दौऱ्यावर सांभाळणार जबाबदारी

नुकताच बुमराहचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एका ट्वीटर यूजरने बुमराहचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामध्ये तो नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. बुमराहची मार्चमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर तो पुनरागमनासाठी NCA मध्ये प्रशिक्षण घेत आहे. माजी दिग्गज क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मणची नजर बुमराहवर असून त्यांच्या प्रशिक्षणाखाली तो सराव करत आहे.

हेही वाचा: Sunil Gavaskar: टीम इंडियाच्या फिटनेसवर सुनील गावसकरांनी ओढले ताशेरे; म्हणाले, “हे टी२० मध्येच थकले पुढे आणखी…”

विशेष म्हणजे बुमराह हा टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ७२ वनडे त १२१ विकेट्स घेतल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने दोनदा पाच-पाच विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने ३० कसोटी सामन्यात १२८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ६० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ७० विकेट्स घेतल्या आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये तो टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टी२० सामन्यानंतर तो संघाबाहेर आहे.

श्रेयस अय्यर कधी पुनरागमन करणार?

गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असलेला श्रेयस अय्यर पुन्हा-पुन्हा दुखापतग्रस्त होत आहे. त्याच्या पाठीची दुखापत वेळोवेळी पुन्हा दिसून आली आहे. शस्त्रक्रियेनंतर त्याने पुन्हा फलंदाजीला सुरुवात केली आहे. गेल्या फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीदरम्यान दुखापतीमुळे मधल्या फळीतील या फलंदाजाला आयपीएलला मुकावे लागले होते. बुमराहप्रमाणेच अय्यरही आयर्लंडला जाण्याची शक्यता आहे.

Story img Loader