भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमहार सध्या पाठीच्या दुखापतीशी संघर्ष करतोय. याच दुखापतीमुळे तो आशिया चषक स्पर्धेत सहभाही होऊ शकला नाही. लवकर बरा होण्यासाठी जसप्रीत सध्या खूप मेहनत घेत आहे. मात्र अद्याप तो यातून पूर्णपणे बरा होऊ शकलेला नाही. असे असताना तो आगामी टी-२० विश्वचषकासाठी परतणार का? असा प्रश्न विचारला जोताय. दरम्यान, यावर बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाष्य केले आहे. जसप्रीत बुमराह चांगल्या प्रकारे रिकव्हर होताना दिसतोय. तो आगामी टी-२० विश्वचषक सामन्यांत संघाचा भाग असेल अशी आशा आहे, असे भाष्य बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >> “हार्दिक पंड्या मैदानात म्हणजे भारताकडे १२ खेळाडू,” ३ देशांच्या संघांना प्रशिक्षण दिलेल्या माजी खेळाडूने केले तोंडभरून कौतूक

याबाबतचे सविस्तर वृत्त InsideSport या क्रीडाविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने दिले आहे. या वृत्तानुसार जसप्रीत बुमहार चांगल्या प्रकारे रिकव्हर होत आहे. “तो दुखापतीतून चांगल्या प्रकारे सावरत आहे. आमचे डॉक्टर्स त्याच्या सातत्याने संपर्कात आहे. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये नसतानादेखील आमचे त्याच्यावर लक्ष आहे. तो भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मालिकेपर्यंत पुनरागमन करू शकेन. टी-२० विश्वचषकापर्यंत तर तो नक्कीच पूर्णपणे बरा झालेला असेल. मात्र सध्याच यावर स्पष्ट भाष्य करणे घाईचे ठरेल,” असे या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >> Video : अर्शदीप विरुद्ध आवेश खान! भारत-पाक सामन्यानंतर टीम इंडियाच्या दोन खेळाडूंमध्येच झाली लढत

मागील अनेक काळापासून तो पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. गोलंदाजी करण्याच्या त्याच्या विशेष पद्धतीमुळे त्याच्या शरीरावर परिणाम पडतो आणि त्याला दुखापत होते. मात्र वेळोवेळी तो दुखापतीतून सावरलेला आहे आणि भारतासाठी खेळताना त्याने चांगली कामगिरी केलेली आहे.

हेही वाचा >> Asia Cup 2022: एकीकडे भारत-पाक सामना रंगत असताना तिकडे कोहली-रोहित.. ‘तो’ क्षण झाला कॅमेऱ्यात कैद

दरम्यान, सध्या जसप्रीत बुमराह मुंबईमध्ये राहात आहे. त्यानंतर फिटनेट टेस्टसाठी तो परत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये परतणार आहे. १५ सप्टेंपर्यंत बीसीसीआयला टी-२० विश्वचषकासाठी आपली टीम निवडायची आहे. त्यामुळे जसप्रीतकडे अवघे १५ दिवस शिल्लक आहेत. जसप्रीत टी-२० विश्वचषकाच्या बाहेर राहिला तर भारताकडे वेगवान गोलंदाजांमध्ये फक्त भुवनेश्वरकुमार असेल. त्यामुळे जसप्रीत दुखापतीतून बरा होणे भारतासाठी खूप गरजेचे आहे.