जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरूद्ध नुकत्याच झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी या मालिकेत कर्दनकाळ ठरला. बुमराहने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत विक्रमी ३२ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावरील फलंदाजांपासून ते समालोचकांपर्यंत सर्वांनीच बुमराहच्या गोलंदाजीचा धसका घेतला. पण आता बॉर्डर गावस्कर स्पर्धा संपली असूनही बुमराहच्या भेदक गोलंदाजीची हवा मात्र ऑस्ट्रेलियात कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुमराहच्या वेगवान गोलंदाजीची हवा ऑस्ट्रेलियामध्ये अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या बिग बॅश लीग २०२४-२५ च्या सामन्यात बुमराहचा उल्लेख केला गेला. बीबीएलमधील ब्रिस्बेन हिट वि सिडनी थंडर सामना गाबाच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यातील लॉकी फर्ग्युसनच्या एका चेंडूने सिडनी थंडरच्या फलंदाजाला चकित केलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉ समालोचन करत होते. मार्क वॉ यांनी फर्ग्युसनची गोलंदाजी पाहून त्याने थेट बुमराहसारखी गोलंदाजी केल्याचे म्हटले.

हेही वाचा – Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडचा संघ अफगाणिस्तानविरूद्ध सामना खेळणार नाही? ब्रिटेनच्या नेत्यांचं क्रिकेट बोर्डाला पत्र

बीबीएलमधील या सामन्यात समालोचन पॅनलचा भाग असलेले मार्क वॉ यांनी हा जबरदस्त चेंडूचं जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीशी कनेक्शन जोडलं. फर्ग्युसन हा एक वेगवान गोलंदाज आहे. गोलंदाजी करण्याआधी त्याने बुमराहसारखा रनअप घेतल्याचं मार्क वॉ म्हणाले.

हेही वाचा – VIDEO: रोहित-विराटच्या मदतीला धावला युवराज सिंग; ट्रोलर्सचा समाचार घेताना म्हणाला…

फर्ग्युसनने यंदाच्या मोसमात BBL मधील फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने चकित केलं आहे. हंगामातील २५व्या सामन्यात थंडर वि हीटच्या सामन्यात फर्ग्युसनने उत्कृष्ट गोलंदाजी केली. संघाचा सलामीवीर जॅक वूडला धारदार चेंडू टाकून त्याचा त्रिफळा उडवला आणि अवघ्या २ धावांवर त्याला बाद केले. फर्ग्युसनची गोलंदाजी पाहून मार्क वॉ यांना बुमराहची आठवण झाली. गेले २ महिने सातत्याने सामन्यांमध्ये बुमराहची गोलंदाजी त्यांनी पाहिली होती. दरम्यान फर्ग्युसनचा रनअप पाहून वॉ म्हणाले, त्याचा रन अप पाहून जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत असल्यासारखं वाटलं.

हेही वाचा – ICC Test Team Rankings: भारताला पाकिस्तानच्या पराभवाचा कसोटी क्रमवारीत धक्का, ऑस्ट्रेलियानंतर आफ्रिकेमुळे टीम इंडिया ‘या’ स्थानावर घसरली

३३ वर्षीय वेगवान गोलंदाज या हंगामात थंडर्सच्या वेगवान आक्रमणातील एक प्रमुख आकर्षण ठरला असून त्याने आतापर्यंत ६ सामन्यांत ८ विकेट घेतले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, फर्ग्युसनचा इकॉनॉमी रेट उल्लेखनीय ७.१६ आहे. ज्यामुळे तो आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात उत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक बनला आहे. फर्ग्युसन याआधी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि गुजरात टायटन्स (GT) सारख्या संघांकडून खेळला होता. न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मागील हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) कडून खेळला होता. आयपीएल लिलावापूर्वी फ्रँचायझीने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला.