Jasprit Bumrah ICC Mens Cricketer Of The Year Nomination: सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील आघाडीचा वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहने आपली ओळख निर्माण केली आहे. बुमराहने एकट्याने त्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. बुमराहचा चेंडू कळण्याआधीच फलंदाज बाद झालेला असतोय. सध्या सुरू असलेल्या भारताच्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेतही बुमराहने एकट्याने ३१ विकेट घेतले आहेत. याचबरोबर आता बुमराहच्या कामगिरीची दखल आयसीसीने घेतली असून त्याला दोन पुरस्कारांसाठी नामांकन मिळालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जसप्रीत बुमराहला प्रथम वर्षातील सर्वाेत्कृष्ट कसोटी खेळाडू या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आणि आता यानंतर बुमराहला वर्षातील सर्वाेत्कृष्ट क्रिकेटपटू या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं आहे.

हेही वाचा – IND vs AUS: “…त्या क्षणीच आम्ही सामना गमावला”, रोहित शर्माने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण; सामन्यानंतर मोठं वक्तव्य

जसप्रीत बुमराहने २०२४ मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे आणि म्हणूनच त्याला आता वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूसाठी सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीसाठी निवडण्यात आले आहे. त्याच्यासह इंग्लंडचा हॅरी ब्रूक, ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आणि इंग्लंडचा जो रूट यांनाही नामांकन मिळाले आहे.

हेही वाचा – IND vs AUS: अश्विनच्या मेलबर्न कसोटीदरम्यान खोचक पोस्ट व्हायरल, रोहित-विराटला केलं लक्ष्य? ट्रोलिंगनंतर स्वत:च सांगितलं सत्य

टी-२० विश्वचषक २०२४ विजयात बुमराहची मोठी भूमिका

भारताला टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद मिळवून देण्यात बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यंदा झालेल्या टी-२० विश्वचषकातील ८ सामन्यात त्याने एकूण १५ विकेट घेतल्या. महत्त्वाच्या प्रसंगी तो टीम इंडियासाठी तारणहार ठरला. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. बुमराहने क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये आपण उत्कृष्ट खेळाडू असल्याचे दाखवून दिले आहे.

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताला पराभवानंतर धक्का, अंतिम फेरी गाठण्याकरता भारतासाठी कसं असणार समीकरण?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने एकूण ८ विकेट्स घेतल्या आणि एकट्याने भारताला कसोटी सामन्यात विजय मिळवून दिला. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ केवळ १५० धावाच करू शकला. यासामन्यात बुमराहने कर्णधाराची भूमिकाही पार पाडली होती.

हेही वाचा – Yashasvi Jaiswal Wicket: यशस्वी जैस्वाल आऊट की नॉट आऊट? तिसर्‍या पंचांच्या निर्णयावरून मतमतांतरं; पुन्हा एकदा भारताविरूद्ध चुकीचा निर्णय?

जसप्रीत बुमराहला यंदाच्या आयसीसीच्या वर्षातील सर्वाेत्कृष्ट कसोटी खेळाडूचे नामांकन मिळाले आहे. यामध्ये त्याची स्पर्धा श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिस, इंग्लंडच्या जो रूट आणि हॅरी ब्रूक यांच्याशी आहे. आता ही ट्रॉफी कोणाला मिळणार यावर सर्वांचे लक्ष असणार आहे, कारण या चारही खेळाडूंनी आपआपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrah nominated for t20 icc trophies of 2024 test cricketer of the year and mens cricketer of the year bdg