Jasprit Bumrah angry on MI video viral : जसप्रीत बुमराहला सध्याच्या घडीला जगातील महान क्रिकेटपटू म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. फॉरमॅट कोणताही असो, प्रत्येक फलंदाज बुमराहचा सामना करायला कचरतो. जसप्रीत बुमराहने २०२४ च्या टी-२० विश्वचषक ४.१७ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या होता. वास्तविक आजच्या काळात बड्या गोलंदाजांची वनडे इकॉनॉमीने यापेक्षा वाईट असते. जसप्रीत बुमराहाचा सामना करताना फलंदाज नेहमी धावा करण्यापेक्षा फलंदाज अधिक विकेट वाचवण्याचा प्रयत्न करतात. आता बुमराहचा मुंबई इंडियन्सवर रागावल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जसप्रीत बुमराहचा जुना व्हिडीओ व्हायरल –

जसप्रीत बुमराहने २०१३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांचे वय १९ वर्षे होते. तो मुंबईच्या स्काऊट टीमचा शोध आहे. जसप्रीत बुमराह सुरुवातीपासूनच त्याचा अनोख्या बॉलिंग अॅक्शनमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला होता. आता मुंबई इंडियन्सने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये बुमराहच्या नावासमोर उजव्या हाताचा मीडियम पेसर असे लिहिले होते. ज्यामुळे तो खूश दिसत नाही. त्यामुळे पुढे व्हिडीओमध्ये बुमराह म्हणतोय, पण हे चुकीचे आहे, नाही का? मी मीडियम पेसर नाही, फास्ट बॉलर आहे.

Vinesh Phogat slams PT Usha
Vinesh Phogat on PT Usha: “पीटी उषा यांनी गुपचूप फोटो घेतला आणि त्यानंतर राजकारण…”, विनेश फोगटचा मोठा आरोप
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Rohit Sharma share funny reel on instagram
Rohit Sharma : रोहित शर्माने वर्कआउट करत असतानाचा शेअर केला ‘फनी’ VIDEO, चाहते म्हणाले…
Sourav Ganguly says Rishabh Pant to become All Time Great in Test Cricket
IND vs BAN : गिल-जैस्वाल नव्हे तर ‘हा’ २६ वर्षीय खेळाडू भारताचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज, सौरव गांगुलीचा दावा
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”

पहिल्याच षटकात विराट कोहलीला केले होते बाद –

जसप्रीत बुमराहने आयपीएल २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पदार्पण केले होते. त्याच्यासमोर जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करणारा विराट कोहली होता. विराटने बुमराहला पहिल्या चार चेंडूत तीन चौकार ठोकले. यावेळी बुमराहला रनअपमध्ये त्रास होत होता. यानंतर रनअपच्या ठिकाणी वाळू ओतली गेली आणि पुढच्याच चेंडूवर त्याने विराट कोहलीला एलबीडब्ल्यू करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

हेही वाचा – AFG vs NZ Test : ग्रेटर नोएडा स्टेडियममध्ये पावसाचा कहर, अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटीचा तिसरा दिवसही रद्द

२०१६ मध्ये भारतासाठी केले पदार्पण –

२०१६ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसप्रीत बुमराहला भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत त्याने भारतासाठी ३६ कसोटी, ८९ एकदिवसीय आणि ७० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत १५९ आणि एकदिवसीय सामन्यात १४९ विकेट्स आहेत. बुमराहने टी-२० इंटरनॅशनलमध्येही ८९ फलंदाजांना बाद केले आहे. भारताकडून शेवटचा टी-२० विश्वचषक खेळलेला बुमराह बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून मैदानात परतणार आहे.