Jasprit Bumrah react on Bed Rest fake news : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ‘बेड रेस्ट’च्या बातमीबाबत मौन सोडले आहे. त्याने स्वत: याबाबतचे सत्य सांगितले आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे वृत्त बुमराहने फेटाळून लावले. ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात त्याला पाठीचा त्रास झाला होता. यानंतर त्याला शेवटच्या डावात गोलंदाजीही करता आली नाही. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली.

बुमराहकडून बेड रेस्ट बातमीचे खंडन –

खरं तर, एका सूत्राचा हवाला देत अलीकडील अहवालात असा दावा करण्यात आला होता की, बुमराहला रिकव्हरी करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी घरी आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बेड रेस्टनंतर, तो बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (सीओई) जाऊ शकतो आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल. तथापि, बुमराहने बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत या दाव्यांचे खंडन केले.

जसप्रीत बुमराहची एक्स पोस्ट –

जसप्रीत बुमराहने एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले, “मला माहित आहे की खोट्या बातम्या पसरवणे सोपे आहे, परंतु या बातमीने मला हसू आले. सूत्रं विश्वसनीय नाहीत.” याबरोबरच बुमराहने हसण्याचे इमोजीही शेअर केले आहेत.

हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुरु केला सराव, मुंबईतील बीकेसीत धावतानाचा VIDEO व्हायरल

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने पाच कसोटी सामन्यांच्या ९ डावात ३२ विकेट्स घेतल्या. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत तो संयुक्त-सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने ऑस्ट्रेलियात प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला. त्याने या शानदार कामगिरीच्या जोरावर डिसेंबर २०२४ च्या महिन्याचा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड देखील जिंकला. बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या डॅन पॅटरसनला मागे टाकत या पुरस्कारावर नाव कोरले.

हेही वाचा – IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम

गोलंदाजीसोबतच बुमराहने ऑस्ट्रेलियात आपल्या कर्णधारपदाचीही छाप पाडली. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याने पर्थमधील पहिल्या कसोटीत भारताला २९५ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. शेवटच्या कसोटीत रोहित बाहेर पडला तेव्हाही बुमराहने नेतृत्व केले पण त्याला दुखापत झाली. भविष्यात रोहितच्या जागी भारताचा कसोटी कर्णधार म्हणून बुमराह आघाडीवर आहे पण फिटनेसशी संबंधित चिंताही आहेत. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त होईल की नाही याबाबत सध्या सस्पेंस आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

Story img Loader