बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी सज्ज झालेल्या भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. गेले काही दिवस दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेला जसप्रीत बुमराह लवकरच भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. जसप्रीत बुमराह सध्या आपल्या दुखापतीमधून चांगल्या पद्धतीने सावरत असून आगामी वर्षात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत तो भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

बुमराहला झालेल्या दुखापतीमुळे त्याला उपचाराकरता इंग्लंडला नेण्यात आलं होतं. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट झालं. दिवाळीच्या दिवसांमध्ये जसप्रीतने व्यायामावर भर दिल्यामुळे तो लवकरच बरा होईल, असं वैद्यकीय पथकातील एका सुत्राने IANS वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

जानेवारी महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ २ कसोटी, ३ वन-डे आणि ५ टी-२० सामने खेळेल. त्याआधी घरच्या मैदानावर भारताला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे. या मालिकेत बुमराह भारतीय संघात पुनरागमन करेल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.

Story img Loader