IND vs AUS Jasprit Bumrah and Sam konstas Fight: भारत-ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटीत मोठा रोमांच अनुभवायला मिळत आहे. भारतीय संघ पहिल्या दिवशी ऑल आऊट झाला तर अखेरच्या सत्रात फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियानेही एक विकेट गमावली. पण यादरम्यान सॅम कॉन्स्टासने बुमराहशी वाद घालण्याचा प्रयत्न केला, जो ऑस्ट्रेलियाला पुढच्याच चेंडूवर चांगलाच भारी पाडला. सॅम कॉन्स्टास मेलबर्न कसोटीपासून भारतीय संघाशी आणि बुमराहशी वादात उडी घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण बुमराहने त्याला वेळोवेळी चोख उत्तर दिलं आहे.
सिडनी कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडलेला भारतीय संघ १८५ धावा करून पहिल्याच दिवशी सर्वबाद झाला. भारताची टॉप फलंदाजी ऑर्डर फेल ठरल्याने भारताने झटपट विकेट गमावल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँडने उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताच्या धावांच्या आशांवर पाणी फेरलं. यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपताना अखेरची १५ मिनिटं शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी उतरला.
हेही वाचा – IND vs AUS: “रोहित शर्मासाठी मेलबर्न कसोटी शेवटची…”, सिडनी कसोटीदरम्यान सुनील गावस्करांचं मोठं वक्तव्य
बुमराहशी कॉन्स्टासने मुद्दाम घातला वाद
ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीसाठी सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजाची जोडी उतरली. भारताकडून बुमराहने गोलंदाजीला सुरूवात केली. कॉन्स्टासने पुढे येऊन पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला आणि सामन्याला सुरूवात केली. यासह ऑस्ट्रेलियाने पहिल्या षटकात ६ धावा केल्या. तर दुसऱ्या षटकात सिराजने चांगली गोलंदाजी करत २ धावा दिल्या. पुढचे षटक टाकण्यासाठी बुमराह आला होता. भारताला दिवसाचा खेळ संपेपर्यंत जास्तीत जास्त षटक टाकून विकेट्स घेण्याचा प्रयत्न होता. पहिल्याच षटकात बुमराहचा चेंडू ख्वाजाच्या बोटाला लागला आणि त्याचं बोट सुजलं होतं. त्यात काही वेळ गेला होता.
बुमराह आणि कॉन्स्टासमध्ये नेमका कशावरून झाला वाद?
यानंतर बुमराहने त्याचे षटक पूर्ण व्हावे यासाठी तिसऱ्या षटकात झटपट रनअपसाठी तयार होत गोलंदाजी करत होता. बुमराह पाचवा चेंडू टाकण्यासाठी रनअप घेत होता. तर ख्वाजा त्याला थांबवत होता. बुमराह परत तयार झाला आणि ख्वाजाने पुन्हा एकदा त्याला थांबण्याचा इशारा दिला. तर बुमराहने काय प्रकार आहे असं हातवारे करत म्हटलं. तितक्यात नॉन स्ट्रायकर एंडवर उभा असलेला कॉन्स्टस मागे वळून बुमराहला बोलू लागला रनअपसाठी तयार असलेला बुमराह तुला काय प्रॉब्लेम आहे?, असं सातत्याने म्हणत पुढे आला तितक्यात पंचांनी मध्यस्थी केली. मुख्य म्हणजे बुमराह पूर्णवेळ उस्मान ख्वाजाबरोबर बोलत होता की जेणेकरून बुमराह त्याचे षटक पूर्ण करू शकेल, पण ख्वाजा तयार होत असताना कॉन्स्टास अचानक बुमराहला काहीतरी बोलू लागला आणि मग हा वाद झाला.
पंचांनी मध्यस्थी करताच बुमराह आणि कॉन्स्टास एकमेकांना काहीतरी म्हणत माघारी गेले आणि बुमराहने गोलंदाजी केली तर ख्वाजाने तो चेंडू खेळला पण धाव नाही घेतली. यानंतर अखेरच्या चेंडूवर बुमराहने टाकलेला चेंडू डावखुऱ्या ख्वाजाने खेळला आणि चेंडू बॅटची कड घेत स्लिपमध्ये उभ्या असलेल्या केएल राहुलच्या दिशेने गेला आणि राहुलने एक उत्कृष्ट झेल टिपताच भारताला पहिली विकेट मिळाली अन् बुमराहने चांगलाच बदला घेतला. विकेट मिळताच भारताच्या संपूर्ण संघाने जबरदस्त सेलिब्रेशन करत कॉन्स्टासची बोलती बंद केली. अशारितीने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने