Jasprit Bumrah shared a video on Instagram and informed about his comeback: भारतीय क्रिकेट संघाचे चाहते बऱ्याच दिवसांपासून एका खेळाडूच्या फिटनेस अपडेटची वाट पाहत आहेत, तो म्हणजे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. आता त्याने स्वतःच त्याच्या पुनरागमनाबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट दिली आहे. पाठीच्या ताणाच्या समस्येमुळे बुमराह गेल्या वर्षी सप्टेंबरपासून सतत मैदानाबाहेर आहे.

जसप्रीत बुमराहने ही समस्या दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) रिहॅब प्रक्रियेतून जात आहे. माजी दिग्गज क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मणची नजर बुमराहवर असून त्यांच्या प्रशिक्षणाखाली तो सराव करत आहे. बराच काळ त्याच्या पुनरागमनाबाबत चर्चा होत आहेत. आता आशिया चषकातून पुनरागमन करू शकतो, अशी शक्यता कायम आहे. आता त्याने स्वतःच त्याच्या पुनरागमनाबाबत एक व्हिडीओ शेअर करुन मोठी अपडेट दिली आहे.

Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Jasprit Bumrah set to miss Champions Trophy 2025 group stage matches because of back swelling
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहबद्दल मोठी अपडेट! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘या’ सामन्यांना मुकणार?
BPL 2025 Mahedi Hasan obstructing the field wicket
BPL 2025 : फिल्डरने सोडला कॅच… तरीही केलं अपील, अंपायरने फलंदाजाला दिलं आऊट, VIDEO होतोय व्हायरल
N Jagadeesan smashed 6 fours off 6 balls against Aman Shekhawat during RAJ vs TN match Vijay Hazare Trophy
N Jagadeesan : ६ चेंडू, ६ चौकार… एन.जगदीशनचा अनोखा विक्रम, VIDEO होतोय व्हायरल
Jasprit Bumrah Moment in BBL as Mark Waugh Points out Lockie Ferguson Unconventional Delivery Like Indian Pacer Video
VIDEO: यत्र तत्र बुमराह; लॉकी फर्ग्युसनलाही आवरला नाही जसप्रीत बुमराहची अ‍ॅक्शन कॉपी करण्याचा मोह
Yuvraj Singh Backs Rohit Sharma Virat Kohli Amid Heavy Criticism on Poor Form
VIDEO: रोहित-विराटच्या मदतीला धावला युवराज सिंग; ट्रोलर्सचा समाचार घेताना म्हणाला…
Yuzvendra Chahal Drunk and Stumbling While Walking Video Goes Viral Amid Divorced Rumours
Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलला नशेत चालताही येईना, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ‘तो’ Video व्हायरल, मद्यधुंद अवस्थेत…; नेमकं काय घडलेलं?

आयर्लंडविरुद्धच्या दौऱ्यातून कमबॅक करण्याची शक्यता –

बुमराहने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अनेक फोटो आहेत, ज्यात तो गोलंदाजी करताना दिसत आहे. या पोस्टसह बुमराहने लिहिले की, मी घरी परत येत आहे. यावरून हे स्पष्टपणे समजू शकते की बुमराहचे पुनरागमन आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत होऊ शकते.

विश्वचषकात भारतीय संघाच्या गोलंदाजीला बळ मिळेल –

जर बुमराह आयर्लंडविरुद्ध मैदानात परतला तर आशिया कपदरम्यान संघ व्यवस्थापनाला त्याच्या फिटनेसची योग्य चाचणी घेण्याची संधी मिळेल. अशा परिस्थितीत बुमराहने आशिया चषकात चांगली कामगिरी केली, तर वनडे विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला निश्चितच मोठा दिलासा मिळेल. यामुळे संघाचा वेगवान गोलंदाजी विभाग मजबूत होणार आहे, ज्यामध्ये मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज आधीच उपस्थित आहेत.

हेही वाचा – FIFA Women’s WC 2023: ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेत ३२ संघ होणार सहभागी, जाणून घ्या वेळापत्रक आणि स्ट्रीमिंगबद्दल

जसप्रीत बुमराहची कारकीर्द –

विशेष म्हणजे बुमराह हा टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ७२ वनडे त १२१ विकेट्स घेतल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने दोनदा पाच-पाच विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने ३० कसोटी सामन्यात १२८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ६० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ७० विकेट्स घेतल्या आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये तो टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टी२० सामन्यानंतर तो संघाबाहेर आहे.

Story img Loader