IND vs AUS Jasprit Bumrah Wicket and Team India Celebration Video: सिडनी कसोटीत सॅम कॉन्स्टासने बुमराहशी वाद घातल्याचा ऑस्ट्रेलियाला चांगलाच फटका बसला आहे. पाचव्या कसोटी जसप्रीत बुमराह टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात बुमराहबरोबरच कॉन्स्टासने वाद घातला आणि मग कॉन्स्टासला याचं प्रत्युत्तर संपूर्ण संघाने मिळून दिलं. बुमराहने पहिल्या दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर ख्वाजाची विकेट घेताच बुमराहसह भारतीय संघाने अनपेक्षित असं सेलिब्रेशन केलं ज्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

भारतीय संघ १८५ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर टीम इंडिया गोलंदाजीला उतरली. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने नेहमीप्रमाणे सामन्याच्या सुरूवातीला भारताला विकेट मिळवून देत आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली आणि त्याने दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर उस्मान ख्वाजाला बाद केले.

Why Rohit Sharma Test Debut Delayed by 3 Years After Tragic Accident Read Story
Rohit Sharma: रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीची सुरूवातही अपघाताने अन् शेवटही, पदार्पण ३ वर्ष का गेलं होतं लांबणीवर? वाचा सविस्तर
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
IND vs AUS Rohit Sharma name missing from official list of Indian squad for Sydney Test goes viral
IND vs AUS : विश्रांती सोडा, रोहित शर्मा स्क्वॉडमध्येच नाही? गौतम गंभीरच्या सहीनिशी यादीचा फोटो व्हायरल!
Rohit Sharma Test Career To End as Selectors told He is not part of the selectors plan beyond the Australia tour
Rohit Sharma: रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर कसोटी संघातून कायमची विश्रांती
Image of Bengaluru traffic, auto rickshaw, or a related graphic
Bengaluru Crime : ड्रायव्हर चुकीच्या दिशेला वळाला अन् तरुणीने मारली रिक्षातून उडी, बंगळुरूत मध्यरा‍त्री थरारक घटना
IND vs AUS Virat Kohli did not hit a single four in his first tine 69 ball innings in Test cricket career in Sydney
IND vs AUS : विराट कोहलीचा लाजिरवाणा विक्रम! कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच असं घडलं
Rishabh Pant Statement on Rohit Sharma Dropping Himself From Sydney Test Said It was Emotional Call IND vs AUS
IND vs AUS: “रोहित शर्मा बाहेर बसणं आमच्यासाठी भावनिक…”, ऋषभ पंतचं सिडनी कसोटीदरम्यान भावुक करणारं वक्तव्य; पाहा VIDEO
Jasprit Bumrah breaks Bishan Singh Bedi's record during IND vs AUS Sydney Test
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने घडवला इतिहास! ऑस्ट्रेलियात ‘हा’ मोठा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज

हेही वाचा – IND vs AUS: “तुझा प्रॉब्लेम काय आहे?”, कॉन्टासने घातला बुमराहशी वाद, मधल्या मध्ये गेला ख्वाजाचा बळी; VIDEO व्हायरल

जसप्रीत बुमराह एक शांत गोलंदाज आहे, त्याला क्वचितच कोणीतरी संतापलेल्या किंवा प्रतिस्पर्धी संघाला उद्देशून करणारं सेलिब्रेशन करताना पाहिलं आहे. या सामन्यातही बुमराह गोलंदाजी करताना शांत दिसत होता, मात्र अचानक ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज सॅम कॉन्स्टासने बुमराहशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा सलामीवीर ख्वाजा फलंदाजी करत होता, तर बुमराह गोलंदाजीसाठी रनअप घेत होता, पण ख्वाजा तयार नव्हता. त्यामुळे पंच आणि ख्वाजा यांनी बुमराहला थांबण्याचे संकेत दिले. तर बुमराहने नाराजी व्यक्त करत ख्वाजाला काय असं विचारलं.

हेही वाचा – IND vs AUS: “रोहित शर्मासाठी मेलबर्न कसोटी शेवटची…”, सिडनी कसोटीदरम्यान सुनील गावस्करांचं मोठं वक्तव्य

दरम्यान, सॅम कॉन्स्टास बुमराहने काहीतरी बोलण्यास सुरुवात केली, जे बुमराहला आवडलं नाही आणि दोन्ही खेळाडू आपापसात वाद घालताना दिसले. तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूच्या आधी ही घटना घडली. यानंतर बुमराहने ५वा चेंडू टाकला जो डॉट बॉल होता. यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बुमराहने बाहेर जाणारा चेंडू उस्मान ख्वाजाला टाकला आणि त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू उस्मानच्या बॅटच्या कडेला आदळला आणि केएल राहुलने स्लिपमध्ये अप्रतिम झेल घेतला.

हेही वाचा – IND vs AUS : विराट कोहलीचा लाजिरवाणा विक्रम! कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच असं घडलं

उस्मान ख्वाजा बाद होताच बुमराह स्वतःला रोखू शकला नाही आणि बुमराहने मागे फिरत कॉन्स्टसकडे जळता कटाक्ष टाकत आक्रमक सेलिब्रेशन केले. ख्वाजा बाद होताच भारताच्या संपूर्ण संघाने एकच जल्लोष करत कॉन्स्टासच्या समोर जात आक्रमक सेलिब्रेशने केले. कॉन्स्टासकडे यावर काहीच उत्तर नव्हते आणि तो दिवसाचा खेळ संपल्यावर उस्मान ख्वाजासह पॅव्हेलियनमध्ये परतला.

Story img Loader