Jasprit Bumrah Fitness: भारतीय क्रिकेट चाहते अनेक दिवसांपासून स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. त्याच्या मनात एकच प्रश्न आहे की बुमराह कधी पुनरागमन करणार? सत्य हे आहे की याचे उत्तर ना बुमराहकडे आहे ना त्याची काळजी घेणार्या लोकांकडे आहे. मात्र, यादरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे की राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) त्याच्या फिटनेसवर वेगाने काम करत आहे आणि सुधारणा देखील दिसून येत आहेत पण विश्वचषकाधी खेळणार का? याबाबत मात्र, साशंकता आहे.
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) नेट प्रॅक्टिस दरम्यान सात षटके टाकली, पण दुखापतीतून सावरल्यानंतर तो राष्ट्रीय संघात कधी परतणार, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. मात्र, नेटमध्ये बुमराहची गोलंदाजी ही २०२३ विश्वचषकाची वाट पाहत असलेल्या भारतीय चाहत्यांकडून चांगली बातमी मानली जात आहे. वर्ल्ड कपचे वेळापत्रक मंगळवारी मुंबईत जाहीर करण्यात आले.
बुमराहने मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये वारंवार पाठीच्या समस्येसाठी शस्त्रक्रिया केली होती आणि तेव्हापासून तो पुन्हा फिटनेसवर अधिक भर देत आहे. बुमराहने भारतासाठी शेवटचा सामना सप्टेंबर २०२२मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरगुती टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळला होता. अशा परिस्थितीत बुमराह आयर्लंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत की आशिया कपमध्ये पुनरागमन करू शकेल का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
संघात पुनरागमन कधी करणार सांगता येत नाही
आता प्रश्न असा पडतो की, तो आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत किंवा आशिया कपमध्ये पुनरागमन करू शकेल? असे विचारले असता, एका एन.सी.ए.च्या सूत्राने वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना सांगितले की, “या प्रकारच्या दुखापतीसाठी वेळ ठरवणे शहाणपणाचे नाही कारण सतत देखरेख करणे आवश्यक आहे. मात्र, असे म्हणता येईल की बुमराहची तब्येत चांगली आहे आणि त्याने एन.सी.ए. मध्ये तो सराव करत आहे.”
बुमराह एनसीएमध्ये सराव सामना खेळणार आहे
सूत्राने पीटीआयला पुढे सांगितले की, “बुमराह पुढील महिन्यात एनसीएमध्ये काही सराव सामने खेळेल आणि त्यानंतर त्याच्या फिटनेसचे बारकाईने मूल्यांकन केले जाईल.” दरम्यान, टीम इंडियाचे माजी फ़िजिओ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक रामजी श्रीनिवासन म्हणाले की, “बुमराहला परत आणण्यासाठी वेळेची काळजी घेणे आवश्यक आहे, त्याने घाई करू नये. एनसीएमध्ये सराव सामने खेळणे हे एक चांगले पाऊल आहे कारण यामुळे त्याच्या शरीराला परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत होईल. परंतु त्याने वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळवण्यापूर्वी काही देशांतर्गत सामने खेळले पाहिजेत,” असेही ते पुढे म्हणाले.
रामजी पीटीआयला म्हणाले, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मागण्या वेगळ्या आहेत आणि शरीराने तेवढा कामाचा भार उचलण्यासाठी पूर्णपणे तयार असले पाहिजे. तणावग्रस्त मानसिकता आणि फ्रॅक्चरमधून बरे होणे हा एक नाजूक व्यायाम आहे आणि बुमराहला जास्तीत जास्त पुनरागमनासाठी वेळ दिला पाहिजे. के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर देखील अपेक्षेप्रमाणे प्रगती करत आहेत. मात्र, त्यांच्या परतीसाठी कोणतीही विशिष्ट वेळ निश्चित केलेली नाही. राहुलच्या मांडीवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली, दुसरीकडे श्रेयसच्या पाठीच्या खालच्या भागात फुगवटा झाल्यामुळे त्याच्यावरही लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.”