Jasprit Bumrah break Wasim Akram record in IND vs AUS Perth Test : र्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्याच कसोटीत बुमराहने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहने कर्णधाराचा काटेरी मुकूट डोक्यावर असताना भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाज अपयशी ठरले असले, तरी गोलंदाजीत त्यांनी कमाल केली. दुसऱ्या दिवशी सकाळी जसप्रीत बुमराहने ॲलेक्स कॅरीला बाद करत मोठा पराक्रम केला आहे. त्याने कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरीत करत वसीम अक्रमचा विक्रम मोडला.
बुमराहने झहीर-इशांतची केली बरोबरी –
ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा पाहुण्या संघाचे गोलंदाज कांगारू फलंदाजांची अशी वाईट अवस्था करतील, याची कल्पनाही कोणी केली नसेल. भारताच्या १५० धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा ७ गडी गमावून ६७ धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी बुमराहने ४ फलंदाजांची शिकार केली. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच बुमराहने ॲलेक्स कॅरीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत कसोटीत अकराव्यांदा ५ विकेट्स घेत शानदार कामगिरी केली. कसोटीत सर्वाधिक वेळा ५ विकेट्स घेण्याच्या बाबतीत त्याने झहीर खान आणि इशांत शर्मा यांची बरोबरी केली.
बुमराहने वसीम अक्रमचा विक्रम मोडला –
इतकेच नाही तर बुमराहने सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये सातव्यांदा कसोटी डावात ५ विकेट्स घेण्याचा मोठा पराक्रम केला. अशा प्रकारे बुमराहने कपिल देव यांच्या सेना देशांमध्ये सर्वाधिक ५ विकेट्स घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. बुमरानने कपिल देवची बरोबरी करतानाच पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमचा विक्रमही मोडीत काढला. बुमराहने ॲलेक्स कॅरीच्या रूपाने ऑस्ट्रेलियन भूमीवर आपला ३७वा बळी घेतला. अशाप्रकारे बुमराह १९९० नंतर ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट्स घेणारा आशियाई वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने वसीम अक्रमला (३६) मागे टाकले आहे.
u
u
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट्स घेणारे आशियाई वेगवान गोलंदाज (१९९० पासून) –
जसप्रीत बुमराह : ३७
वसीम अक्रम : ३६
मोहम्मद शमी : ३१
इशांत शर्मा : ३१
उमेश यादव : ३१