Jasprit Bumrah Becomes 1st Indian Pacer to Win ICC Test Cricketer of The year: भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड कोणताही देश असो किंवा खेळपट्टी असो विकेटची १०० टक्के खात्रा म्हणजे जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना घाम फोडणाऱ्या बुमराहने आयसीसीचा पुरस्कार जिंकत इतिहास घडवला.

जसप्रीत बुमराह २०२४ चा आयसीसी सर्वाेत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू ठरला आहे. बुमराह हा पुरस्कार जिंकणारा भारताचा सहावा खेळाडू तर भारतीय संघाचा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला. बुमराहच्या आधी राहुल द्रविड (२००४), गौतम गंभीर (२००९), वीरेंद्र सेहवाग (२०१०), रविचंद्रन अश्विन (२०१६) आणि विराट कोहली (२०१८) यांनी हा पुरस्कार पटकावला होता. बुमराहने २०२४ मध्ये १३ कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक ७१ विकेट घेत सर्वच गोलंदाजांना मागे टाकलं.

Azmatullah Omarzai Becomes 1st Afghanistan Player to Win ICC Mens ODI Player of The Year 2024
ICC Awards: अफगाणिस्तानच्या खेळाडूने घडवला इतिहास, ICC चा ‘हा’ पुरस्कार पटकावणारा ठरला देशाचा पहिलाच खेळाडू
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Magnus Carlsen Accepts D Gukesh World Chess Championship Challenge
“ही माझी शेवटची स्पर्धा…”, मॅग्नस कार्लसनने डी गुकेशचं जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचं आव्हान स्वीकारलं, खोचक वक्तव्य करत काय म्हणाला?
Uzbekistan Chess Player refuses to shake hands with Vaishali on religious grounds Later Apologizes
धार्मिक कारणांमुळे वैशालीशी हात मिळवला नाही; उझबेकिस्तानच्या ग्रँड मास्टरचा खुलासा
Larsen & Toubro (L&T) loses a significant Rs 70,000 crore submarine deal after CEO's controversial 90-hour workweek statement.
L&T ला धक्का, सरकारने रद्द केली ७० हजार कोटींची निविदा; कर्मचाऱ्यांनी ९० तास काम करावे म्हणाल्याने कंपनी चर्चेत
Smriti Mandhana Announced as ICC Womens ODI Cricketer of The Year Who is Leading Run Scorer in 2024
ICC Women’s ODI Cricketer of The Year: स्मृती मानधना ठरली सर्वाेत्कृष्ट वनडे क्रिकेटपटू २०२४, नॅशनल क्रशने मोडला होता वर्ल्ड रेकॉर्ड
WTC Points Table Pakistan Finish Last After West Indies Defeat in Multan Test as Spin Plan Backfires
WTC Points Table: पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवानंतर अजून एक धक्का, WTC गुणतालिकेत पहिल्यांदाच…
third T20 cricket match India against England today sports news
आघाडीचे लक्ष्य; इंग्लंडविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज

जसप्रीत बुमराहसाठी २०२४ हे वर्ष खूप चांगले गेले. कसोटी क्रिकेटमध्ये तर बुमराहने ऐतिहासिक स्पेल टाकत सर्वांनाच चकित केले.२०२३ च्या अखेरीस पाठीच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर बुमराहने कसोटीत पुनरागमन केले आणि २०२४ मध्ये तो भारताचा सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक राहिला. गेल्या वर्षी मायदेशात इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्धच्या कसोटी संघाच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही बुमराहने आश्चर्यकारक कामगिरी केली.

जसप्रीत बुमराहने २०२४ मध्ये एकूण १३ कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्याने १४.९२ च्या सरासरीने ७१ विकेट घेतल्या. गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बुमराह त्याच्याशिवाय इतर कोणत्याही गोलंदाजाला ६० विकेट्सचा आकडाही गाठता आला नाही. कसोटी इतिहासात एका कॅलेंडर वर्षात ७० अधिक विकेट्स घेणाऱ्या १७ गोलंदाजांपैकी कोणत्याच गोलंदाजाने बुमराहइतक्या कमी सरासरीने विकेट्स घेतलेल्या नाही. त्याच वेळी, बुमराह हा भारताचा फक्त चौथा गोलंदाज आहे ज्याने एका कॅलेंडर वर्षात ७० अधिक कसोटी विकेट घेतले आहेत.

ICC टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर निवडल्यानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला, “हा फॉरमॅट माझा सर्वात आवडता फॉरमॅट आहे. मला नेहमीच कसोटी क्रिकेट खेळायचे होते. गेलं वर्ष माझ्यासाठी खूप खास होतं. मी खूप काही शिकलो आणि संघासाठी सामनेही जिंकले. विशाखापट्टणम कसोटीतील ओली पोपची विकेट माझ्यासाठी सर्वात खास होती. कारण त्या विकेटनंतर सामन्याचा रोख बदलला. हा पुरस्कार जिंकल्याचा खूप आनंद आहे.”

Story img Loader