What Jasprit Bumrah Changed in Bowling Action: जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे पुन्हा भारतीय संघाची जर्सी घालण्यासाठी १० महिने आणि २३ दिवस वाट पाहावी लागली. पण आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात त्याच्या शानदार गोलंदाजीने तो आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी खेळण्यास सज्ज असल्याचे या वेगवान गोलंदाजाने दाखवून दिले. तो वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करण्यास सज्ज. या काळात, बुमराह पुढील दुखापत टाळण्यासाठी गोलंदाजीसाठी लांब ‘रन-अप’ आणि लांब ‘फॉलो थ्रूचा’ वापर करताना दिसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुमराहची घ्यावी लागेल काळजी –

भारतीय क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे की, संघ व्यवस्थापनाने बुमराहला अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागेल. बुमराह मात्र त्याच्या शरीराबद्दल अधिक जागरूक आहे आणि चांगल्या व्यवस्थापनामुळे तो भविष्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत राहू शकतो. आयर्लंडविरुद्ध चार षटकांत २४ धावांत दोन बळी घेणारा बुमराह भारतीय संघ व्यवस्थापनासाठी दिलासादायक बातमी असेल. बंगळुरू येथील एनसीए येथे त्याची रिहॅब (दुखापतीतून बरे होण्याची प्रक्रिया) आणि ‘खेळात परत येण्याची’ कठीण प्रक्रिया पार पडली.

हेही वाचा – Asia Cup 2023: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी सनी देओलने भारताला दिला महत्त्वाचा सल्ला, VIDEO होतोय व्हायरल

जसप्रीत बुमराहने फॉलो-थ्रूमध्ये केला मोठा बदल –

एनसीएच्या प्रशिक्षकाने गोपनीयतेच्या अटीवर ‘पीटीआय-भाषा’ला सांगितले की, “जर तुम्ही बुमराहच्या ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’ होण्यापूर्वीचा त्याचा बॉलिंग व्हिडिओ तुम्ही बारकाईने पाहिल्यास, तर तो पहिले सहा-सात पावले वेगाने धावायचा आणि नंतर सातव्या पावलावर बॉलिंग क्रिजजवळ पोहोचल्यावर चेंडू फेकायचा.”

ते पुढे म्हणाले, “आयर्लंडविरुद्ध असे दिसून आले की त्याने आपली रन-अपला दोन-तीन पावले वाढवले आहे. रन-अपसह त्याने आपला फॉलो-थ्रूही वाढवला आहे. त्याने गोलंदाजीच्या अॅक्शनमध्ये फारसा बदल केलेला नसून दीर्घकाळ दुखापतीपासून वाचण्यासाठी त्याने किरकोळ सुधारणा केल्या आहेत.”

हेही वाचा – Lasith Malinga: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! लसिथ मलिंगाचे MI संघात पुनरागमन, सांभाळणार ‘ही’ जबाबदारी

रन-अपमध्ये केली वाढ –

बुमराहला त्याची रन-अप का वाढवावा लागला असे विचारले असता प्रशिक्षक म्हणाले, “गोलंदाजांना वेग वाढवण्यासाठी याची गरज असते. बुमराह पहिल्या फायटर प्लेनसारखा होता. शॉर्ट रनअपमधूनही त्याला वेग मिळायचा. तथापि, यामुळे त्याच्या खांद्यावर आणि पाठीवर खूप ताण पडायचा. त्याच्या रन-अपमुळे त्याला गती मिळत नव्हती, त्यामुळे त्याला दुखापत होणे साहजिकच होते.” प्रशिक्षक पुढे म्हणाले, “दुखापतीतून सावरल्यानंतर मला वाटते की त्याने रन-अप दोन-तीन पावले वाढवला आहे. पाठीवर कमी ताण पडावा म्हणून त्याचा फॉलो-थ्रूही वाढवला आहे. मला वाटते की हे त्याला भविष्यात जखमी होण्यापासून वाचवेल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrahs change in bowling action after injury the coach revealed vbm