Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्याच्या खराब फिटनेसमुळे तो मैदानापासून अंतर राखत आहे. त्‍यामुळे तो गतवर्षी आशिया चषक आणि टी२० विश्‍वचषकातही सहभागी होऊ शकला नाही. त्याला फिट होण्यासाठी आणखी ६ महिने लागू शकतात. त्यामुळे यंदाचे आयपीएल आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरीतून तो जवळपास बाहेर पडला आहे. त्याच वुमेन्स प्रीमियर लीग (WPL 2023) दरम्यान, त्याची पत्नी संजना गणेशन हिचा एक फोटो व्हायरल होत आहे, असा दावा केला जात आहे की लवकरच त्यांच्या घरात लहान बाळ येणार असून ते आई-बाबा होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जसप्रीत बुमराह लवकरच बाबा होणार?

टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन हे सर्वात जास्त चर्चेत असलेले जोडपे आहेत. हे सुंदर जोडपे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. त्याच वेळी, WPL 2023 दरम्यान, संजना गणेशनचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे. तिच्याकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी, तिचे हे छायाचित्र पाहिल्यानंतर ती लवकरच एका निरोगी बाळाला जन्म देऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. प्रसिद्ध स्पोर्ट्सकास्टर संजना गणेशन आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचे मार्च २०२१ मध्ये लग्न झाले होते.

बुमराह-संजनाचे १५ मार्च रोजी लग्न झाले

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन यांनी १५ मार्च २०२१ रोजी गोव्यात एका खासगी समारंभात लग्न केले आणि त्यानंतर त्यांचा अनंत कारज समारंभ गुरुद्वारामध्ये झाला. त्याच्या लग्नात फक्त जवळचे नातेवाईक दिसले. तर संजना गणेशन तिच्या कामासाठी खूप सक्रिय आहे. लग्नानंतर आठवड्याभरातच ती कामावर परतली. सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्याने ही माहिती चाहत्यांसोबत दिली आहे.

हेही वाचा: RCB-W vs DC-W: शफाली-मेग लॅनिंगची धडाकेबाज खेळी! दीडशतकी भागीदारीने WPLमध्ये रचला इतिहास, विजयासाठी बंगळुरूसमोर २२४ धावांचे आव्हान

जसप्रीत बुमराह पुनरागमन कधी होणार?

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात बुमराह जखमी झाला. त्याला पाठीसंदर्भातील समस्या आहे. मागील वर्षी आशिया चषक आणि टी२० विश्वचषक स्पर्धेमध्येही त्याला खेळता आलं नाही ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, तो आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपही खेळमार नाही. भारतीय चाहते आता बुमराह किमान या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या एकदिवस क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेत तरी दिसावा यासाठी प्रार्थना करत आहेत. मात्र बुमराहच्या गुडघ्यावर सर्जरी करावी लागणार असल्याचं निश्चित आहे. बुमराहने डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा गोलंदाजीचा सराव सुरु केला होता. त्यामुळेच निवड समितीने त्याला श्रीलंकेविरुद्धच्या व्हाइट बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी संघात स्थान दिलं होतं. मात्र तो पूर्णपणे फिट नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrahs wife will give good news soon sanjana ganesans photo became a viral topic avw